डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका? व्हाईट हाऊसमध्ये पाठवलं विषाचं पाकिट

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 20 September 2020

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी एक विषाने भरलेले पाकिट पोलिसांच्या हाती लागले आहे.

वॉशिग्टंन- अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी एक विषाने भरलेले पाकिट पोलिसांच्या हाती लागले आहे. खळबळजनक म्हणजे हे पाकिट राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने पाठवण्यात आले आहे. या पाकिटमध्ये रिसिन नावाचे विष असल्याची शंका असून याचा तपास केला जात आहे. अमेरिकी न्यूज चॅनल सीएनएनने शनिवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. अमेरिकी राष्ट्रपती भवन व्हाईट हाऊसमध्ये पाठवण्यात आलेल्या प्रत्येक पत्राचे किंवा पार्सलची सखोल तपासणी केली जाते. काही संदिग्ध आढळले नाही, तरच ते व्हाईट हाऊसमध्ये पाठवले जाते. 

अमेरिकेतील एका कायदा अधिकाऱ्याने सांगितलं की, पाकिट कॅनाडामधून पाठवण्यात आलं आल्याची प्राथमिक माहिती आहे. पाकिट नेमकं कोठून आलं याबाबत अधिक तपास केला जात आहे. द फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन (FBI) आणि सिक्रेट सर्विस याप्रकरणी तपास करत आहेत. असे असले करी सर्वसामान्य लोकांसाठी भीतीचे कोणतेही कारण नही. 

बिथरलेल्या पाकिस्तानची नवी खेळी; खोब्रागडेंना नाकारला व्हिसा

काय आहे रिसिन?

रिसिन एक घातक पदार्थ आहे. याला कास्टर बीन्स पासून मिळवलं जातं. याचा वापर दहशतवादी हल्ल्यांसाठी यापूर्वी करण्यात आला आहे. रिसिनला पाऊडर, पेस्ट किंवा अॅसिडच्या रुपात वापरात आणले जाऊ शकते. रिसिन विष खाल्याने उलट्या होऊ लागतात, त्यानंतर पोट, आतड्यांमधून रक्तस्त्राव सुरु होतो. लीव्हर, स्प्लीन आणि किडनी फेल होऊ लागते. रिसिन दिलेल्या व्यक्तीची पूर्ण सर्कुलेटरी सिस्टिम ठप्प होते आणि त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: america president donald trump life in danger Poison packet sent to the White House