G-20 Summit : 'भारताच्या G-20 अध्यक्षपदाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तयार' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Joe Biden Narendra Modi

G-20 च्या अध्यक्षपदाच्या काळात भारत देशातील 55 ठिकाणी सुमारे 200 बैठका आयोजित करणार आहे.

G-20 Summit : 'भारताच्या G-20 अध्यक्षपदाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष तयार'

वॉशिंग्टन : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन G-20 मध्ये सहभागी होणार आहेत. अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी आमचे प्रयत्न सुरू असून बायडेन (Joe Biden) भारताला G-20 अध्यक्षपदासाठी अन्न आणि ऊर्जा सुरक्षा आव्हानांसह समर्थन करण्यास उत्सुक आहे, असं स्पष्ट मत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन पियरे (Karine Jean Pierre) यांनी व्यक्त केलं.

भारत आज G-20 चं अध्यक्षपद स्वीकारणार

भारत (India) आजपासून एका वर्षासाठी जगातील सर्वात आर्थिकदृष्ट्या संपन्न देशांचा समूह असलेल्या G-20 च्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणार आहे. या काळात भारताला आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक कार्यक्रमात योगदान देण्याची अनोखी संधी मिळणार आहे. G-20 हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचं प्रमुख व्यासपीठ आहे. जे जागतिक GDP च्या 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतं.

हेही वाचा: Crime News : शाळेत पॉर्न व्हिडिओ बघणाऱ्या 5 विद्यार्थ्यांचा अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

G-20 ची पुढील वर्षी बैठक होणार

G-20 च्या अध्यक्षपदाच्या काळात भारत देशातील 55 ठिकाणी सुमारे 200 बैठका आयोजित करेल. पुढील वर्षी होणारी G-20 शिखर परिषद ही भारतानं आयोजित केलेल्या सर्वोच्च स्तरीय बैठकांपैकी एक असेल. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात G-20 ची पहिली बैठक उदयपूरमध्ये होणार असल्याची माहिती आहे. याआधी पंतप्रधान मोदींनी नोव्हेंबरच्या सुरुवातीला भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 चा लोगो, थीम आणि वेबसाइट लॉन्च केली होती. त्या लोगोमधील कमळाचं फूल हे भारताच्या प्राचीन वारसा, श्रद्धा आणि विचारसरणीचं प्रतीक आहे.