Mother put her Baby in Microwave Oven: आई की सैतान? चिमुकल्या बाळाला ओव्हनमध्ये ठेवलं अन् गेली झोपायला.. निष्पाप जीवाचा भयानक मृत्यू!

Mother put her Baby in Microwave Oven: अमेरिकेतील मिसुरीमध्ये एका महिलेच्या निष्काळजीपणाने तिच्या लहान बाळाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
Mother put her Baby in Microwave Oven
Mother put her Baby in Microwave OvenEsakal

अमेरिकेतील मिसुरीमध्ये एका महिलेच्या निष्काळजीपणाने तिच्या लहान बाळाचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ती आपल्या मुलाला पाळण्याऐवजी ओव्हनमध्ये झोपवते. मात्र, तिच्या हे लक्षात आले नाही. महिलेने कथितरित्या तिच्या बाळाला झोपण्यासाठी पाळण्याऐवजी 'ओव्हन' (अन्न पदार्थ तयार करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी वापरलेले उपकरण) मध्ये ठेवले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.  (Marathi Tajya Batmya)

एका सरकारी वकिलांनी काल (शनिवारी) ही माहिती दिली. कॅन्सस सिटीच्या मारिया थॉमसवर बाळाला धोका पोहोचवल्याचा आरोप आहे. महिलेने हे चुकून केले की जाणूनबुजून केले? याचा पोलिस तपास करत आहेत.

शुक्रवारी दुपारी एका अर्भकाला श्वास घेत नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेच्या संभाव्य कारणाबाबत न्यायालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, बाळाच्या शरीरावर भाजलेल्या खुणा होत्या आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. निवेदनात म्हटले आहे की, 'एका साक्षीदाराने सांगितले की आईने, "चुकून बाळाला झोपण्यासाठी पाळणाऐवजी ओव्हनमध्ये ठेवले."(Latest Marathi News)

Mother put her Baby in Microwave Oven
Ganpat Gaikwad Firing Case : गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजीत यादवला अटक; मुलगा अद्याप फरार

पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा महिलेने सांगितले की, रात्री मुलाला दूध पाजल्यानंतर तिने त्याला पाळण्याजवळ झोपवण्यास सुरुवात केली. पण नंतर तिने चुकून बाळाला ओव्हनमध्ये कसे ठेवले ते तिला माहित नाही. सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला समजले की, तिने चुकून बाळाला ओव्हनमध्ये झोपवले होते. ओव्हन उघडताच त्यामध्ये बाळ जळाल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ बाळाला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनात मुलाचा मृत्यू गुदमरल्याने आणि भाजल्याने झाल्याचे समोर आले आहे.

Mother put her Baby in Microwave Oven
सोलापूरमध्ये पोलिस बंदोबस्तात 'निर्भय बनो'! कार्यक्रमाला येणाऱ्यांची पोलिसांकडून झडती

अशी चूक कशी झाली हे निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले नाही. "ही एक अत्यंत दुःखद घटना आहे आणि एका तिमुकल्या जीवाच्या मृत्यूमुळे आम्ही दु:खी आहोत, भीषण घटनेबाबत प्रशानस योग्य ती कारवाई करेल", असे जॅक्सन काउंटीचे वकील जीन पीटर्स बेकर यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Mother put her Baby in Microwave Oven
Sanjay Raut: संजय राऊतांचा धडाका सुरूच! मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा आणखी एक फोटो केला शेअर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com