esakal | अमेरिकेने आम्हाला चिथावणी देऊ नये - उत्तर कोरिया
sakal

बोलून बातमी शोधा

north korea

उत्तर कोरिया आणि अमेरिका हे दोन्ही देश ऐतिहासिक संमेलनासाठी तयारी करत असतानाच उ. कोरियाने आज पुन्हा अमेरिकेला धमकावले आहे. अमेरिकेने लष्करी इशारे देत आमच्यावर दबाव आणू नये, असे कोरियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

अमेरिकेने आम्हाला चिथावणी देऊ नये - उत्तर कोरिया

sakal_logo
By
वृत्तसंस्था

प्येंगयोंग, ता. 7 (वृत्तसंस्था) : उत्तर कोरिया आणि अमेरिका हे दोन्ही देश ऐतिहासिक संमेलनासाठी तयारी करत असतानाच उ. कोरियाने आज पुन्हा अमेरिकेला धमकावले आहे. अमेरिकेने लष्करी इशारे देत आमच्यावर दबाव आणू नये, असे कोरियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा त्याग करत नाही तोवर त्यांच्यावरील निर्बंध मागे घेतले जाऊ शकत नाही, असा इशारा अमेरिकेने दिल्याने कोरिया संतापला आहे. निर्बंधांची भीती दाखवून अमेरिका जाणीवपूर्वक आम्हाला चिथावणी देत आहे, अशी नाराजीही उत्तर कोरियाकडून व्यक्त करण्यात आली. पुढील आठवड्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम-जोंग-ऊन यांची भेट होण्याची शक्‍यता आहे. 

उभय देशांच्या नेत्यांमधील ही पहिलीच बैठक आहे, दरम्यान उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये समेट झाल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. 1953 मधील कोरियन युद्धानंतर प्रथमच किम यांनी दक्षिणेशी मैत्रीचा हात पुढे केल्याने हा संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत आहेत. आता अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर किम यांनी पुन्हा डोळे वटारल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

loading image