धक्कादायक! ट्रकमध्ये सापडले तब्बल 42 जणांचे मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल Sant Antonio | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

America Crime News

ट्रकमधून सुमारे 40 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

धक्कादायक! ट्रकमध्ये सापडले तब्बल 42 जणांचे मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

वॉशिंग्टन : अमेरिकेमधील टेक्सास (U.S. Texas) प्रांतातील सेंट अँटोनियो (Sant Antonio) शहरात ट्रकमध्ये 40 जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आलीय. एपीच्या वृत्ताचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयनं लिहिलंय, ट्रकमधून सुमारे 40 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. BNO वृत्तसंस्थेनं WOAI च्या अहवालाचा हवाला देत ही माहिती दिलीय.

वृत्तसंस्थेनं KSAT टीव्हीच्या हवाल्यानं सांगितलं की, आतापर्यंत ट्रकमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दक्षिण-पश्चिम बाजूस ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये किमान 42 लोक मृतावस्थेत आढळले आणि इतर 16 लोकांना वेगवेगळ्या परिस्थितीत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलंय. दरम्यान, घटनास्थळी सेंट अँटोनियो पोलिस, अग्निशमन ट्रक आणि रुग्णवाहिका दाखल झालीय. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा: मोदी G7 परिषदेत असताना मोठा निर्णय, Twitter कडून पाकिस्तानी दूतावासांवर बंदी

दक्षिण आफ्रिकेच्या नाईट क्लबमध्ये 17 जणांचा संशयास्पद मृत्यू

काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) पूर्व लंडनमधील नाईट क्लबमध्ये (Nightclub) 17 जणांचा मृत्यू झाला होता. एएफपीनं पोलिसांच्या हवाल्यानं सांगितलं की, रविवारी पहाटे सीनरी पार्कमधील एनोबेनी टॅव्हर्नमध्ये ही घटना घडली. डेली डिस्पॅच न्यूज साइटनुसार, पूर्व लंडनच्या केप प्रांताच्या काठावर असलेल्या सीनरी पार्कमधील एनोबेनी टॅव्हर्न इथं रविवारी पहाटे ही घटना घडली होती. ईस्टर्न केप पोलिसांचे (Eastern Cape Police) प्रवक्ते ब्रिगेडियर टेम्बिंकोसी किनाना यांनी सांगितलं की, 'मृतांमध्ये १८ ते २० वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. नाईट क्लबच्या केबिनमध्ये 17 लोक मृतावस्थेत आढळले. क्लबमध्ये सर्वत्र मृतदेह आढळून आले, परंतु कोणाच्याही अंगावर जखमेच्या खुणा नाहीयत, अशी माहिती त्यांनी दिली होती. आता पुन्हा ट्रकमध्ये मृतदेह सापडल्याने अमेरिकेत खळबळ उडालीय.

Web Title: America Texas Sant Antonio More Than 42 Dead Body Found In 18 Wheeler Truck

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime Newsamerica
go to top