
रेडिओ पाकिस्तानच्या ट्विटर हँडलवरही बंदी घालण्यात आलीय.
मोदी G7 परिषदेत असताना मोठा निर्णय, Twitter कडून पाकिस्तानी दूतावासांवर बंदी
इस्लामाबाद : भारतातील ट्विटरनं यूएन, तुर्की, इराण, इजिप्तमधील (Egypt) पाकिस्तानी (Pakistan Embassies) दूतावासांच्या ट्विटर हँडलवर बंदी घातलीय. यासोबतच रेडिओ पाकिस्तानच्या ट्विटर हँडलवरही बंदी घालण्यात आलीय.
भारतात ट्विटरच्या या कारवाईनंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं (Pakistan Ministry of Foreign Affairs) ट्विटरला ही खाती तातडीनं रिस्टार्ट करण्याची विनंती केलीय. खरं तर, भारताच्या आयबी मंत्रालयानं 26 यूट्यूब चॅनेलवर (YouTube Channel) बंदी घातली होती, त्यापैकी 6 चॅनेल पाकिस्तानचे होते.
हेही वाचा: MIM चा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हांना जाहीर पाठिंबा; ओवैसींची मोठी घोषणा
भारताच्या या कारवाईनंतरच ट्विटरनं पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर हँडलवर (Pakistan Twitter Handle) बंदी घातलीय. ज्या यूट्यूब चॅनलवर बंदी घालण्यात आलीय, ते भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचा आरोप करण्यात आलाय. कारण, ते लोकांमध्ये खोटी माहिती पसरवत होते.
Web Title: Twitter In India Bans Many Official Twitter Handle Of Pakistan Embassies
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..