ज्यूनिअर डोनाल्ड ट्रम्प यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 21 November 2020

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष  जो बायडन (Joe Biden)  यांनी देशात वेगाने होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव धोकादायक असल्याचे म्हटले असून विद्यमान ट्रम्प प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, असे बायडन यांनी म्हटले आहे. 

वॉशिंगटन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा मोठा मुलगा ज्यूनिअर डोनाल्ड ट्रम्प  (Donald Trump Jr) यांन कोरानाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या प्रवक्त्याने यासंदर्भातील माहिती दिली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासूनच ते स्वत:च्या केबिनमध्ये क्वारंटाईन आहेत.  

अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या माला अडिगांची 'बायडेन टीम'मध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

डोनाल्ड ट्रम्प ज्यूनिअर यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नसून नियमावलीचे योग्य ते पालन करण्यात येत आहे, असेही त्यांच्या प्रवक्ताने सांगितले आहे. 42 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प ज्यूनिअर यांच्यापूर्वी त्यांचा लहान भाऊ बॅरॉन, वडील आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.  

अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष  जो बायडन (Joe Biden)  यांनी देशात वेगाने होणारा कोरोनाचा प्रादुर्भाव धोकादायक असल्याचे म्हटले असून विद्यमान ट्रम्प प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, असे बायडन यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा - ‘रेमेडिसिव्हीर’ प्रभावी ठरत असल्याचा पुरावा नाही; शिफारस न करण्याचा WHO चा निर्णय

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव हा वेगाने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि त्यामुळे मृतांच्या आकड्यात होणारी वाढ ही भयावह आहे. संपूर्ण देशातील परिस्थिती बिकट असून कोरोनाला थोपवण्यासाठी योग्य ते उपाय तात्काळ करावेत, अशी मागणी बायडन यांनी ट्रम्प प्रशासनाकडे केली आहे. कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत झालेल्या निवडणुकीत बायडेन यांनी बाजी मारली आहे. जानेवारीमध्ये ते राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: donald trump eldest son donald trumpjr tests positive for coronavirus