esakal | COVID-19 पार्टी जीवावर बेतली; चूक कळली पण...
sakal

बोलून बातमी शोधा

US, Covid 19, Corona

अखेरचा श्वास घेण्यापूर्वी अमेरिकेतील 30 वर्षांच्या व्यक्तीने नर्ससमोर आपली चूक मान्य केली.

COVID-19 पार्टी जीवावर बेतली; चूक कळली पण...

sakal_logo
By
सुशांत जाधव

न्यूयॉर्क: कोरोनाचा विळखा घट्ट होत असलेल्या अमेरिकेत एका युवा व्यक्तीला पार्टी जीवावर बेतली आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका कोरोना पॉजिटिव्ह व्यक्तीने COVID-19 पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सहभागी झालेल्या 30 वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमेरिकेतील डॉक्टर जेन एप्पलबी यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांसमोर यासंसदर्भातील माहिती दिली. या व्यक्तीच्या मृत्यूसह अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 35 हजार पेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळ मृत्यू झाला आहे.  अमेरिकेतील स्थानिक प्रसारमाध्यमातून कोविड पार्टीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संबंधित रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरने  दिलेल्या माहितीचा एक व्हिडिओ शेअर केलाय.

अखेर ट्रम्प यांच्या तोंडाला मास्क; रुग्णालयात जाण्यापूर्वी घेतली खबरदारी

या व्हिडिओमध्ये डॉक्टरांनी म्हटलंय की, काही लोक आपल्याला कोरोनाची लागण होईल का? हे पाहण्यासाठी आणि मित्रांसोबत मिळून महा साथीवर मात करण्यासाठी पार्टीचे आयोजन करतात. संबंधित रुग्णाने अखेरचा श्वास घेण्यापूर्वी मोठी चूक झाल्याची भावना नर्ससमोर बोलून दाखवली. कोरोना विषयी उगाचच भीती निर्माण केली जात आहे. युवा लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाभाव होणार नाही. ते यावर सहज मात करतील, याच भावनेतून पार्टीमध्ये सहभागी झाल्याचेही त्याने सांगितले होते. कोरोना हा दुर्लक्षित करण्याचा रोग नाही तर त्याकडे गांभिर्याने पाहायला हवे, असे डॉक्टरंनी म्हटले आहे. ते म्हणाले की, तरुणांना आजार जाणवत नाही. पण वास्तवात चाचणीमध्ये खरे रुप समोर येते. त्यामुळे यासंदर्भात काळजी घेण्याची गरज आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या वुहानमधून जगभरात परसलेल्या कोरोना विषाणूने महाशक्ती असलेल्या अमेरिकेला हतबल करुन सोडले आहे. दिवसागणिक अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा वाढताना दिसतोय. ट्रम्प प्रशासनाने वाढत्या संक्रमणाला युवा जबाबदार असल्याचेही म्हटले आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरु असताना देखील ट्रम्प प्रशासन शाळा आणि महाविद्यालये पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चाही चांगलीच रंगत आहे.