
अमेरिकन जनता रस्त्यावर उतरली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलोन मस्क यांच्या विरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. सरकारी नोकऱ्यांमधून कपात, अर्थव्यवस्था, मानवी हक्क, शुल्क आणि इतर मुद्द्यांवरून ट्रम्प प्रशासनाविरुद्ध अमेरिकेत निदर्शने केली जात आहेत. शनिवारी देशभरात रॅली काढण्यात आली. निदर्शकांनी ट्रम्प आणि मस्क हे अमेरिकेसाठी धोका असल्याचे म्हटले आणि ते दोघेही देश उद्ध्वस्त करण्यासाठी एकत्र काम करत असल्याचे म्हटले आहे.