घर वणव्यात जळालं, पतीशी घटस्फोट; अमेरिकन महिला ९ वर्षे लहान भारतीय फोटोग्राफरच्या प्रेमात, आता लग्न करणार

jaclyn forero with Chandan : इन्स्टाग्रामवर तिची ओळख आंध्र प्रदेशातील फोटोग्राफर चंदनशी झाली. हाय, हॅलो मेसेजने सुरू झालेला संवाद वाढला. दोघेही एकमेकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होते. आता दोघेही एकमेकांशी लग्न करणार आहेत.
घर वणव्यात जळालं, पतीशी घटस्फोट; अमेरिकन महिला ९ वर्षे लहान भारतीय फोटोग्राफरच्या प्रेमात, आता लग्न करणार
Updated on

अमेरिकेत २०२१ मध्ये जंगलात वणव्यामुळे लागलेल्या आगीत जॅकलीन फोरेरो नावाच्या महिलेचं घर जळून खाक झालं. पतीशी घटस्फोट झाला आणि महिलेनं सगळं गमावलं. यानंतर इन्स्टाग्रामवर तिची ओळख आंध्र प्रदेशातील फोटोग्राफर चंदनशी झाली. हाय, हॅलो मेसेजने सुरू झालेला संवाद वाढला. काही दिवसातच जॅकलीनला चंदनचा साधेपणा भावला. जवळपास १४ महिने दोघेही एकमेकांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत होते. आता दोघेही एकमेकांशी लग्न करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com