Americans Import Building Materials from China
esakal
अमेरिकेत घर बांधण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत असल्याने काही नागरिक पर्यायी मार्गांचा शोध घेत आहेत. बाल्टिमोरमध्ये राहणारे अभियंता गेन्नादी त्सिगान यांनी आपल्या घरासाठी बहुतांश साहित्य थेट चीनमधून मागवले आहे. २०२४ मध्ये त्यांनी स्वतः चीनमध्ये जाऊन विविध कारखान्यांना भेट देत आवश्यक वस्तू खरेदी केल्या. त्यांचे घर आधुनिक आणि वेगळ्या शैलीचे आहे. आपोआप बंद होणारे दरवाजे, मोठ्या काचांच्या खिडक्या आणि मोकळ्या रचनेचे स्वयंपाकघर यांसारख्या सुविधांमुळे हे घर उठून दिसते.