
इराणमधील डोंगराळ भागात जमिनीखाली खोलवर असलेल्या फोर्दो अणुकेंद्रावर हल्ला फक्त बंकर बस्टर या बाँबमध्येच असल्याने आणि हा बाँब फक्त अमेरिकेकडेच असल्याने इराणवर असा हल्ला होण्याची शक्यता होती, ती खरी ठरली. अमेरिकेने बाँबर विमानातून ‘जीबीयू-५७/बी’ म्हणजेच, बंकर बस्टर बाँबचा वापर करत या अणुकेंद्राचे मोठे नुकसान घडवून आणले. प्रचंड स्फोटके भरलेला हा बाँब म्हणजे अमेरिकेच्या भात्यातील सर्वांत घातक अस्त्रांपैकी एक मानले जाते.