Iran Strike : तेलमार्गाची नाकाबंदी शक्य; होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यास इराणच्या संसदेची मंजुरी
Nuclear Bunker Attack : इराणच्या फोर्दो अणुकेंद्रावर अमेरिकेने ‘जीबीयू-५७/बी’ बंकर बस्टर बाँबचा वापर करून खोल जमिनीत स्फोट घडवून मोठे नुकसान केले. ‘बी-२ बॉम्बर’ या शक्तिशाली विमानातून हे बाँब टाकण्यात आले.
तेहरान : अमेरिकेने थेट अणुकेंद्रांवरच हल्ला केल्याने इराणने अखेर हुकुमी अस्त्र बाहेर काढले आहे. जगातील २० टक्के कच्च्या तेलाची आणि एक तृतियांश नैसर्गिक वायूची वाहतूक होणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्यास इराणच्या संसदेने मंजुरी दिली आहे.