Video: विमान आकाशात अन् दरवाजा उडून गेला; धक्कादायक व्हिडिओ पाहा

अलास्का एअरलाईन बोईंग 737-9 MAX ला एका आपातकालीन घटनेला सामोरे जावे लागले आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा एक दरवाजा हवेत उडून गेला
Alaska Airlines Boeing
Alaska Airlines Boeing

नवी दिल्ली- अलास्का एअरलाईन बोईंग 737-9 MAX ला एका आपातकालीन घटनेला सामोरे जावे लागले आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याचा एक दरवाजा हवेत उडून गेला. एका प्रवाशाने या घटनेचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की कॅबिनचा एक्झिट दरवाजा विमानापासून वेगळा झालेला आहे. ( An Alaska Airlines Boeing faced an emergency after one of its doors blew open mid air viral video )

विमान पोर्टलँडवरुन कॅलिफॉर्नियातील ओनटारिओकडे निघाले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर विमान परत पोर्टलँड आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर उतरवण्यात आले. विमानामध्ये १७१ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात तपास करण्यात येईल आणि कळवण्यात येईल, असं अलास्का एअरलाईन्स प्रशासनाने सांगितले.

Alaska Airlines Boeing
Viral Video : विमानातून कसं दिसतं ढगांची चादर ओढून झोपलेलं शहर; वैमानिकाने काढलेला व्हिडिओ व्हायरल..

यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने सांगितलं की, अलास्का एअरलाईन्स फ्लाईटसंदर्भातील या घटनेचा आम्ही तपास करत आहोत. विमान 16,325 फूट उंचीवर पोहोचले होते. त्यानंतर विमानाला परत पोर्टलँड विमानतळावर लँड करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग 737-9 MAX अलास्का एअरलाईन्समध्ये १ ऑक्टोबर २०२३ मध्ये सामाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रवासी वाहतुकीसाठी याचा वापर सुरु करण्यात आला होता. आतापर्यंत या विमानाचे १४५ फ्लाईट झाले असल्याची माहिती फ्लाईटट्रेडरने दिली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com