
22 वर्ष जगभ्रमंती; 3,62,000 किमी अंतर कापलं; प्रवासातच झाली मुलं
तब्बल 22 वर्षे जगप्रवास केल्यानंतर अर्जेंटिनाचे एक कुटुंब घरी परतणार आहे. 2000 मध्ये त्यांनी हा प्रवास सुरु केला होता. 1928 जॅलोपीमधून त्यांनी पाच महाद्वीपांवर प्रवास केला. त्यावेळी त्यांची लहान असलेली मुलं आता तारुण्यात आली आहेत. अर्जेंटिनातील हर्मन झॅप आणि कँडेलेरिया झॅप असं या दांपत्याचे नाव असून 25 जानेवारी 2000 रोजी ओबिलिस्क येथील ब्यूनस आयर्सच्या डाउनटाउनमधील एक स्मारकापासून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या मुलांसोबत जगभरात एकूण 362,000 किलोमीटर (225,000 मैल) प्रवास केला आहे. सध्या ते उरुग्वेच्या सीमेवर असलेल्या एका गावात थांबले आहेत. (An Argentine family is returning home after 22 years in the world.)
हेही वाचा: Photos: धोनीचा तीन फुटाचा घोडा; पाहा खास फोटो
आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण केल्यानं आनंदी आहे, असं 53 वर्षीय हर्मन याने म्हटले आहे. ट्रिप सुरू झाली तेव्हा 29 वर्षांची असलेली आणि आता 51 वर्षांची असलेली कँडेलेरिया म्हणाली की, वाटेत आलेल्या लोकांना भेटलेले लोक हा तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम शोध होता. "लोक अद्भुत आहेत. मानवता अविश्वसनीय आहे," असं कॅंडेलरिया म्हणाली. या कुटुंबाने 102 देशांना भेट दिली. काहीवेळा त्यांना युद्धे किंवा इतर प्रकारच्या संघर्षांमुळे मार्ग बदलावा लागला.
अर्जेंटिनाच्या या जोडप्याचे लग्न होऊन सहा वर्षे झाली होती, त्यांना चांगल्या नोकर्या होत्या आणि त्यांनी नुकतेच घर बांधले होते. भटकंतीची आवड असलेल्या या जोडप्याला मुलंही प्रवासात झाली. त्यांचा जगभराचा प्रवास अलास्कातील बॅकपॅकिंग ट्रिपने सुरू झाला.
हेही वाचा: पुतिन मनोरुग्ण; पार्किन्सन्सचाही आजार: MI 6 च्या माजी प्रमुखांचा दावा
ग्रॅहम-पेज नावाच्या अमेरिकन मेकची 1928 मॉडेलची कार त्यांना एका व्यक्तीने दिली. कारचं इंजिन खराब होते आणि पेंट भयानक दिसत होता. याशिवाय सीट्स आणि त्यावरचं कुशनही योग्य स्थितीत नव्हतं. त्यात एअर कंडिशनिंगही नाही. अशा कारमध्ये त्यांनी प्रवास केली. या कारमध्ये या उणिवा असल्या तरी ही कार चिखल, शहरांतील रस्ते तसेच वाळूवर चांगली चालते. 22 वर्षात फक्त आठ वेळा टायर्स बदलावे लागले तर दोनदा इंजिन काम करावे लागले.
Web Title: An Argentine Family Is Returning Home After 22 Years In The World
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..