पुतिन मनोरुग्ण; पार्किन्सन्सचाही आजार: MI 6 च्या माजी प्रमुखांचा दावा

पुतिन हे मानसिक रुग्ण असून त्यांना पार्किन्सन्सचा आजार असल्याचा दावा ब्रिटनची गुप्तहेर संघटना MI 6 च्या माजी प्रमुखांनी केला आहे.
putin
putin Sakal

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) जगातील सर्वात ताकदवर नेत्यांपैकी एक आहेत. रशिया युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पुतिन हे गुप्तहेर, खेळाडू, नेमबाज, ट्रेकर तसेच धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणून जगभरातील तरुणांमध्ये प्रसिद्ध आहेत. पुतिन यांच्या याच प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रे करताना दिसत आहेत. पुतिन हे मानसिक रुग्ण असून त्यांना पार्किन्सन्सचा आजार असल्याचा दावा ब्रिटनची गुप्तहेर संघटना MI 6 च्या माजी प्रमुखांनी केला आहे. (Vladimir Putin mentally ill; Parkinson's disease: Former MI6 chief claims)

putin
Russia Ukraine War: रशियावर उत्तर कोरियापेक्षाही अधिक निर्बंध, 70 वर्षांचा विक्रम मोडला

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेसह कोणत्याही युरोपीयन राष्ट्राने रशियावर थेट हल्ला करण्याऐवजी आर्थिक निर्बंधाचं हत्यार उपसलं आहे. त्याचवेळी पुतिन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रोपगंडा युरोपीयन राष्ट्रांकडून राबवला जात आहे. त्यातच ब्रिटीश गुप्तहेर संघटना MI-6 च्या माजी प्रमुखांनी पुतिन हे मानसिक रुग्ण असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. गेल्या काही वर्षातील पुतिन यांच्या हावभावांच्या निरीक्षणावरून त्यांनी हा अंदाज बांधलाय. पुतीन यांना पार्किन्सन्सचाही आजार असू शकतो. त्यामुळे संयम गमावणं, तसेच विचार करण्याची शक्ती गमावणं अशी लक्षणं पुतिन यांच्यात दिसत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

putin
Russia Ukraine War: युद्धाचे 10 दिवस, दहा महत्त्वाच्या घडामोडी

दरम्यान रशियन परराष्ट्र मंत्रालयाने युरोपीयन राष्ट्रे पुतिन यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रोपगंडा पसरवायचा चालला असल्याचं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com