
Afghanistan|अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप, ९२० जणांचा मृत्यू
काबूल : अफगाणिस्तानमधून आज बुधवारी (ता.२२) धक्कादायक बातमी समोर आली आहे. भूकंपात ९२० लोकांचा मृत्यू, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. राॅयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानला (Afghanistan) भूकंपाचे तीव्र झटके बसले आहेत. यामुळे सध्या ९२० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांचा हा आकडा आणखी वाढू शकतो. तसेच बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. (An Earthquake In Afghanistan, Killed At Least 130 People)
हेही वाचा: सैनिकांनी चौकीदार व्हावे ही पंतप्रधान मोदींची इच्छा : असदुद्दीन ओवैसी
रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी नोंदवली गेली आहे. या भूंकपाने अफगाणिस्तानमध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा: इस्रायलमध्ये राजकीय भूकंप; नफ्ताली बेनेट यांचं आघाडी सरकार कोसळलं
भूकंपाचे केंद्र पाकिस्तान सीमेवरील खोस्ट शहर हे होते, असे अमेरिकन भूशास्त्र सर्व्हेकडून सांगण्यात आले. भूकंपाचे धक्के तीव्र होते, असे पाकिस्तानमधील पेशावरच्या रहिवाशाने सांगितले. अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासकचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री मोहम्मद नस्सीम हकानी म्हणाले, पकतिका प्रांतात सर्वाधिक लोकांचा भूकंपामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणात मला धक्कादायक असे काही...उदयनराजेंची प्रतिक्रिया
पकतिका प्रांतात मृतांची संख्या जास्त आहे. येथे २५५ लोकांचा मृत्यू, तर २०० पेक्षा अधिक जण जखमी झाले असल्याचे गृहमंत्री सलाहुद्दीन आयुबी यांनी सांगितले. खोस्ट प्रांतात २५ जणांचा मृत्यू, तर ९० जखमींना दवाखान्यात नेण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
Web Title: An Earthquake In Afghanistan Killed At Least 130 People
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..