
China Earthquake: भारताचा शेजारी देश असलेला चीन आज पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. म्यानमारच्या सीमेलगत भूकंपाचं केंद्र असल्यानं त्याचे जोरदार झटके चीनच्या हद्दीतही जाणवले. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी या भूकंपमापन संस्थेनं याला दुजोरा दिला आहे. हे भूकंपाचं केंद्र जमिनीखाली सुमारे १० किमी खोल असल्याचं सांगण्यात आलं आहे.