अमेरिकन हॉटेलनं हाकललं; अनन्या बिर्लांनी शेअर केला वर्णद्वेषाचा अनुभव

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या अनन्या यांच्यासह कुटुंबाला वर्णद्वेषाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांनी ट्विटरवरून संबंधित रेस्टॉरंटमधील हा वेदनादायी अनुभव शेअर केला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेत वर्णद्वेषाचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या हल्ल्यात लाइव्ह क्लॉइडचा मृत्यू झाल्यानंतर वर्णद्वेषाविरोधात मोठं आंदोलन उभा राहिलं होतं. त्यानंतर जाळपोळीचे प्रकारही घडले होते. दरम्यान, आता कुमार मंगलम बिर्ला यांची कन्या अनन्या यांच्यासह कुटुंबाला वर्णद्वेषाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांनी ट्विटरवरून संबंधित रेस्टॉरंटमधील हा वेदनादायी अनुभव शेअर केला आहे.

अनन्या  बिर्ला यांनी ट्विटरवर म्हटलं की, आम्ही अमेरिकेतील हॉटेलमध्ये गेलो असताना तिथल्या हॉटेलनं अक्षरश: आम्हाला हाकलून दिलं. इटालियन रूटस् या रेस्टॉरंटने मला आणि माझ्या कुटुंबीयांना परिसरातून हाकलले. हे खूप वेदनादायी आहे. तुम्ही तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीनं वागायला हवं असंही अनन्या यांनी म्हटलं. 

रेस्टॉरंटमध्ये वर्णभेदाची शिकार व्हावं लागल्याचा अनुभव अनन्या यांच्यासह आर्यमान बिर्ला यांनीही सांगितल आहे. अनन्या बिर्ला यांनी म्हटलं की, रेस्टॉरंटच्या परिसरात आम्हाला थांबूही दिलं नाही. तसंच जेवण्यासाठी तीन तास ताटकळत रहावं लागलं. त्यानंतरही आम्ही थांबलो होतो.

अनन्या आणि नीरजा यांनी ट्विटरवरून हा वाईट अनुभव सांगितला. त्यानंतर निरजा बिर्ला यांनीही हे धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. रेस्टॉरंटने अत्यंत वाईट असं कृत्य केलं आहे. ग्राहकांसोबत असं वागण्याचा अधिकार तुम्हाला नाही असंही नीरजा बिर्ला यांनी म्हटलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ananya birla tweet us restaurant behave racist