esakal | 'आई कोण होती समजल्याशिवाय तुम्हाला कमला हॅरिस कळणार नाही', बहिणीने केली भावूक पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

kamla-harris.jpg

डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव घोषीत करताच इतिहास रचला गेला आहे.

'आई कोण होती समजल्याशिवाय तुम्हाला कमला हॅरिस कळणार नाही', बहिणीने केली भावूक पोस्ट

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचं नाव घोषीत करताच इतिहास रचला गेला आहे. पहिल्यांदाच अमेरिकेतील एका मोठ्या पक्षाने उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून पहिल्या आशियाई आणि कृष्णवर्णीय महिलेला निवडलं आहे. कमला यांच्या नावाची घोषणा होताच काही तासातच त्यांच्या भगिनी माया हॅरिस यांनी एक भावूक  व्हिडिओ ट्विट केला आहे. 'हे सर्व शक्य झालं आईमुळे' असं त्या या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. 

वेगळा प्रयोग: कर्जमाफीसाठी थेट कारागृहात जाऊन केले आधार प्रमाणीकरण 

कमला यांच्या भगिनी माया हॅरिस यांनी बुधवारी सकाळी ट्विट केलं. जेव्हा तुम्ही आमच्या आईला जाणून घ्याल, तेव्हा तुम्हाला माझ्या बहिणीबद्दल कळेल. आज आम्हाला आईची खूप आठवण येत आहे. पण, ती आणि आमचे पूर्वज आज आनंदी असतील, असं त्या म्हणाल्या आहेत. माया यांनी व्हिडिओ शेअर केला असून यात कमला त्यांच्या आईच्या धाडसाबाबत सांगत आहेत. शिवाय या व्हिडिओमध्ये कमला यांच्या हवानपणापासूनच्या फोटोंचा कोलाज दाखवण्यात आला आहे.

कमला या सिनेटमध्ये काम करणाऱ्या पहिल्या आशीयाई आणि  कृष्णवर्णीय महिला आहेत. कमला यांची आई चेन्नईच्या आहेत आणि वडील जमैकाचे राहणारे आहेत. कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांच्या पोलिस कारवाईत मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अमेरिकेत  कृष्णवर्णीय-गौरवर्णीय मुद्दा पुन्हा पेटला होता. हजारो अमेरिकी नागरिकांनी रस्त्यावर उतरत 'ब्लॅक लाईफ मॅटर' आंदोलन छेडले होते. शिवाय या आंदोलकांनी जो बायडेन यांच्याकडे उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार कृष्णवर्णीय असावा अशी मागणी केली होती. 

'संदीप माहेश्वरी माफी मांगो'; संस्कृतवरून ओढवून घेतला वाद

जो बायडेन यांनी ट्विट करत कमला हॅरिस यांच्या निवडीची घोषणा केली. मला जाहीर करताना गर्व वाटतोय की  शूर युद्ध्या आणि देशाच्या सर्वोत्तम अधिकारी असलेल्या माझ्या साथीदार कमला हॅरिस यांची उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून मी निवड करत आहे, असं ते म्हणाले आहेत. 

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका 3 नोव्हेंबर रोजी होत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार समोरासमोर आहेत. कॅलिफोर्नियाच्या सिनेटर असलेल्या कमला हॅरिस यांनी डेमोक्रॅटकडून जो बायडेन यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून आव्हान दिलं होतं. मात्र, डेमोक्रॅटिककडून राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून बायडेन यांनी निवड झाली.

(edited by-kartik pujari)

loading image