आणि कोंबड्याने जिंकली केस..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

कोंबड्याच्या आवाजामुळे त्रस्त झालेल्या फ्रान्सच्या काही नागरिकांनी चक्क कोंबड्यावरच केस केली होती.

रॅाचफोर्ट : कोंबडा आरवला कि सकाळ झाली अशी परपंरा पूर्वीपासूनच ग्रामीण भागात आहे. मात्र सध्याच्या शहरी जीवनात कोंबड्याची बांग ऐकणे म्हणजे अगदी दूर्मिळच... मात्र याच कोंबड्याच्या आवाजामुळे त्रस्त झालेल्या फ्रान्सच्या काही नागरिकांनी चक्क कोंबड्यावरच केस केली होती.

मात्र पहाटे आरवणे हा कोंबड्याचा गुणधर्म असून त्याच्या आवाजावर कोणी बंधन घालू शकत नाही असे म्हणत न्यायालयाने निकाल कोंबड्याच्या बाजूने दिला आहे. फ्रान्सच्या नागरिक क्रोनी फेस्सीयू यांनी एक कोंबडा पाळला असून मोरिस असे त्याचे नाव आहे. दरम्यान क्रोनी यांचे काही शेजारी सुट्टीच्या काळात तिकडे रहायला आले होते. त्यांनी मोरिसच्या पहाटे आरवण्याने आम्हाला त्रास होतो तसेच ध्वणीप्रदूषण देखील होते असा दावा करत मोरिसविरूद्ध न्यायालयात तक्रार दाखल केली होती. 

काही महिने चालेलल्या या केसमध्ये सोशल मीडियासारख्या माध्यामावरून मोरिसला आपला पाठिंबा असल्याचे ही अनेकांनी दर्शविले तसेच लाखो फ्रान्सवासियांनी देखील 'सेव्ह मोरिस' असे म्हणत मोठ्या संख्येने मोरिसच्या पाठीशी उभे राहिले आणि अखेर गुरूवारी न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार पहाटे आवाज करणे हा कोंबड्याचा गुणधर्म असून त्याच्या बोलण्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही, असे मत न्यायालयाने देत केसचा निकाल मोरिसच्या बाजूने लावला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: and france rooster won court case