esakal | Antiviral गोळी करणार कोरोनाचा धोका कमी; अमेरिकन कंपनीचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Antiviral pill

Antiviral गोळी करणार कोरोनाचा धोका कमी; अमेरिकन कंपनीचा दावा

sakal_logo
By
सुधीर काकडे

जगभरात कोरोना महामारीशी लढण्यासाठी कोरोना लसीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातोय. लसीकरणामुळे कोरोनाची बाधा होण्याचा आणि मृत्यू होण्याचा धोका अतिशय कमी होतो, त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन सरकारकडून केल्या जातंय. त्यातच आता कोरोना विरोधी गोळी (Antiviral pill) तयार करण्यात देखील शास्त्रज्ञांना यश आलंय. क्लिनीकल ट्रायलमध्ये या गोळीचे चांगले परिणाम पाहायला मिळाले आहेत. कोविड -19 चे निदान झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी अँटीव्हायरल गोळी प्रभावी असल्याचे सांगण्यात येते आहे.

हेही वाचा: आता ब्रिटनच्या नागरिकांनाही भारतात आल्यावर व्हावं लागणार क्वारंटाईन

अमेरिकेच्या Merck आणि Ridgeback Biotherapeutics या कंपन्यांनी तयार केलेल्या या औषधाचे कोविड-19 अति संसर्गजन्य समजल्या जाणाऱ्या डेल्टा विषाणूवर देखील चांगले परिणाम दिसून आले आहेत. द हिल ने दिलेल्या वृत्तानुसार चाचणीच्या निकालांच्या आधारे क्लिनिकल ट्रायलनंतर लवकरात लवकर हे औषध बाजारात येणार आहे. युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनकडे आपत्कालीन वापरासाठी अर्ज सादर करणार असल्याचे देखील कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

loading image
go to top