
या प्रकरणात मोहम्मद इब्राहिमला अटक करण्यात आली आहे. तो रिक्षा चालक आहे. त्याने आपल्या मुलांना ज्या जुबेर कॅनॉलमध्ये फेकले तेथूनच त्याला अटक करण्यात आली.
आर्थिक अडचणीमुळे वैतागलेल्या एकाने चक्क आपल्या पाच मुलांना कॅनॉलमध्ये फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये रविवारी हा प्रकार घडला. संबंधित व्यक्तीने जंबेर कॅनोलमध्ये आपल्या मुलांना फेकून दिले. स्थानिक पोलिसांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती दारिद्यामुळे खचला होता. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
डॉनच्या वृत्तानुसार, या प्रकरणात मोहम्मद इब्राहिमला अटक करण्यात आली आहे. तो रिक्षा चालक आहे. त्याने आपल्या मुलांना ज्या जुबेर कॅनॉलमध्ये फेकले तेथूनच त्याला अटक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. 1 वर्षांचा अहमद आणि 4 वर्षांची फिझा या दोन मुलांचे मृतदेह मिळाले असून 3 वर्षांची तशा, 5 वर्षांचा झैन आणि 7 वर्षांची नादिया ही मुलं अद्यापही सापडलेली नाहीत.
चीनची दादागिरी वाढतीये; 'अरुणाचल'जवळ वसवली 3 गावे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षींय मोहम्मद इब्राहिमची पत्नी रझिया बीवी तिच्या माहेरीच आपल्या मुलांसोबत राहत होती. इब्राहिम आपल्या मुलांना भेटायला सासरी गेला. त्यावेळी आर्थिक अडचणींमुळे दोघांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणानंतर तो आपल्या पाचही मुलांना रिक्षातून घेऊन जंबर गावाच्या दिशेने निघून आला. त्याने वाटेवर असलेल्या कॅनॉलमध्ये मुलांना फेकून दिले.