अर्जुन रणतुंगा नेतेपदाच्या शर्यतीत

वृत्तसंस्था
Monday, 31 August 2020

अर्जुन  रणतुंगा 57 वर्षांचे आहेत. ते सुद्धा पराभूत झाले. 2001 मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्यांचे वडील रेगी 1990च्या दशकात श्रीलंका फ्रीडम पार्टीच्या मंत्रीमंडळात होते.

कोलंबो - श्रीलंकेच्या विश्वकरंडक विजेत्या क्रिकेट संघाचे कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी युनायटेड नॅशनल पार्टी या विरोधी पक्षाच्या नेतेपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. संसदेच्या निवडणूकीतील दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे.

विक्रमसिंघे यांच्याकडे गेली 26 वर्षे पक्षाची धुरा होती. या पक्षाला पाच ऑगस्टच्या निवडणूकीत 225 पैकी एकाही जागी विजय मिळविता आला नाही.स्वतः विक्रमसिंघे 1977 नंतर प्रथमच पराभूत झाले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रणतुंगा 57 वर्षांचे आहेत. ते सुद्धा पराभूत झाले. 2001 मध्ये त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्यांचे वडील रेगी 1990च्या दशकात श्रीलंका फ्रीडम पार्टीच्या मंत्रीमंडळात होते. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भाऊ प्रसन्ना हे मात्र राजपक्षे यांच्या सत्ताधारी श्रीलंका पोदुजाना पेरामुना पक्षात असून सध्या पर्यटन मंत्री आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी काही धनाढ्य उद्योगपती नाही किंवा तशा लोकांवर अवलंबून नाही, पण पक्षाच्या पुनर्बांधणीची क्षमता माझ्याकडे आहे. मी हे करू शकतो हे सुद्धा मला ठाऊक आहे. मला नेतृत्वाची हाव मात्र नाही.
- अर्जुन रणतुंगा, माजी खासदार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arjuna Ranatunga enters UNP