अझरबैजान-अर्मेनियात युद्धस्थिती; कोठे आहेत देश आणि कशामुळे वाद?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 September 2020

अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कायम आहे

येरेवान(अर्मेनिया) - अझरबैजान आणि अर्मेनिया यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष कायम आहे. या प्रांताच्या संरक्षण खात्याने दिलेल्या माहितीनुसार 16 सैनिक व दोन नागरिक ठार, तर शंभरहून जास्त जखमी झाले आहेत.

अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलीयेव यांनी मात्र जिवीतहानीबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दर्शविला. अर्मेनियाच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी प्रतिस्पर्धी देशाची चार हेलिकॉप्टर, 33 रणगाडे आणि लढाऊ वाहने निकामी केल्याचा दावा केला. दोन हेलिकॉप्टर पाडल्याचा आधीचा दावा अझरबैजानने फेटाळून लावला होता. हा संघर्ष थांबावा आणि उभय देशांनी चर्चेसाठी तयार व्हावे म्हणून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जी लॅवरोव कसून प्रयत्न करीत आहेत.

कोठे आहेत हे देश?

अर्मेनिया आणि अझरबैजान शेजारी-शेजारी राष्ट्रे असून ते आशिया खंडात येतात. दोन्ही देश एकेकाळी सोवियत संघाचे भाग होते. हे दोन्ही देश यूरोपच्या अगदी जवळ आहेत. भारतापासून हे देश 4 हजार किलोमीटर अंतरावर आहेत. अर्मेनिया आणि अझरबैजान इराण आणि तुर्की या देशांच्या मध्ये येतात. 

मोफत रेशनसाठी आता रेशनकार्डची गरज नाही; सरकारने केला नियमात बदल 

दोन्ही देशांमध्ये का आहे तणाव? 

दोन्ही देश सोवियत संघाचे भाग होते, पण 80 व्या दशकात जेव्हा सोवियत संघाचे पतन झाले, तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाला. नागोर्नो-काराबाख या भागावरुन उभय देशांमध्ये वाद आहे. हा भाग आर्मेनिया आणि अझरबैजानच्या सीमेवर आहे. 1991 साली दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. तीन वर्षांच्या संघर्षानंतर रशियाने हस्तक्षेप केल्याने 1994 साली सीजफायर करण्यात आले. 

आर्मेनिया-अजरबैजानमधील संघर्षावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या वाद  | eSakal

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा भाग अजरबैजानचा आहे, पण यावर आर्मेनियातील टोळ्यांचा ताबा आहे. त्यामुळे आर्मेनियन सैन्याने हा भाग आपल्या ताब्यात ठेवला आहे. चार हजार किलोमीटरचा हा भाग डोंगराळ आहे. या भागात नेहमीच तणावाची स्थिती राहिली आहे. 

2018 मध्येच हा तणाव निर्माण झाला होता, जेव्हा दोन्ही देशांनी आपल्या सीमा भागात सैनिकांची संख्या वाढवली होती. आता हा तणाव युद्धाच्या स्थितीपर्यंत गेला आहे. यूरोपातील अनेक देशांनी आर्मेनिया आणि अझरबैजानला शांततेचे आवाहन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: armenia and azerbaijan war for nagorno karabakh area border