आर्मेनियाशी युद्धामुळे अझरबैजानचं मोठं नुकसान; 3 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

इंटेलिजेंस डाटाच्या माहितीनुसार अझरबैजानचे 3 हजार सर्व्हीसमॅन मारले गेले आहेत.

रशियासारखंच अर्ध्या आशिया आणि अर्ध्या युरोप मध्ये येणाऱ्या अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये अझरबैजानचे खूप नुकसान झाले आहे. या युद्धात 3 हजारहून अधिकांचा मृत्यू झाला असल्याची बातमी आली आहे. 

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रिपब्लिक ऑफ आर्तसखच्या राष्ट्रपतींच्या प्रेस सेक्रेटरी यांनी शनिवारी हा दावा केलाय की इंटेलिजेंस माहितीनुसार त्यांचे 3 हजार सर्व्हीसमॅन मारले गेले आहेत. अनेक मृतदेह अशाठिकाणी आहेत, जिथून त्यांना ट्रांसपोर्टेशन करुन आणलंदेखील जाऊ शकत नाही.  खरं तर, हे सगळे युद्ध 4400 चौरस किमीच्या नागोर्नो काराबाख परिसरातील वर्चस्वावरुन होत आहे.

हेही वाचा - कोरोना टेस्टवेळी झाली चूक आणि मेंदूतील नस फुटली; अमेरिकेतील धक्कादायक प्रकार

नागोर्नो काराबाखला आंतरराष्ट्रीय पातळीवर अझरबैजानचाच भाग मानला जातो. परंतु, या परिसरावर अर्मेनियाच्या जातीय गटांनी ताबा घेतला आहे. हे सगळं प्रकरण 2018 मध्ये सुरु झालं आहे. जेव्हा दोन्ही देशांच्या सैन्याने बॉर्डरवर आपल्या सैनिकांची संख्या वाढवली होती. आता हा सगळा तणाव युद्धात परिवर्तित झाला आहे. युरोपातील अनेक देशांनी या युद्धाला पुर्णविराम देऊन शांती प्रस्थापिक करण्याचे आवाहन केले आहे. 

सध्यपरिस्थितीत  हा परिसर अझरबैजानमध्ये येतो. मात्र, इथे अर्मेनियाच्या भागातील लोक अधिक आहेत. अशातच अर्मेनियाच्या सेनेने याला आपल्या ताब्यात घेतलं आहे. जवळपास चार हजार चौरस किमीचा हा डोंगराळ प्रदेश आहे, जिथे तणावाची परिस्थीती आहे. 1991 मध्ये नागोर्नोच्या लोकांनी या परिसरावर अझरबैजानपासून स्वातंत्र्य घोषित करुन अर्मेनियाचा भाग बनला होता, तेव्हापासूनच या दोन्ही देशात हा वाद सुरु आहे आणि सातत्याने संघर्ष  होत आहे. 

हेही वाचा - महिला खासदाराची कोरोना असूनही संसदेत एन्ट्री; पक्षातून हकालपट्टी

पहिल्या जागतिक महायुद्धानंतर 1918 आणि 1921 मध्ये अर्मेनिया आणि अझरबैजान स्वतंत्र झाले होते. हे दोन्हीही देश 1922 मध्ये सोव्हीयत युनियनचा भाग बनले होते. रशियाचे नेते जोसेफ स्टालिन यांनी अझरबैजानच्या एका भागाला अर्मेनियाला देऊन टाकलं होतं जो पहिल्यांदा अझरबैजानच्या ताब्यात होता. तेव्हापासूनच या दोन्ही देशात हा वाद सुरु आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: armenia army killed 3000 servicemen of azerbaijan in nagorno karabakh