'पूछता है भारत'मध्ये पाकविरोधात द्वेष; चॅनेलला भरावा लागणार 20,000 पौंड दंड

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 23 December 2020

कोणाच्याही भावना दुखावणारे वक्तव्य हे ऑफकॉमच्या नजरेत गुन्हा आहे. हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षपित करु नये. तसेच नियमावलीचे पालन करावे, अशी सूचना वजा ताकीदही देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आंतरराष्ट्रीय झटका बसला आहे. युकेतील हिंदी भाषिक 'रिपब्लिकन भारत' चॅनेलवरुन 6 डिसेंबरला  'पूंछता है भारत' कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानच्या नागरिकांविरोधात भडकावण्याचे आणि द्वेष पसरवणारी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात हट स्पिचच्या नियमाच उल्लंघन झाले असा अरोप चॅनेलवर करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून वादात सापडत असलेल्या अर्णब गोस्वामी यांच्यावर आणखी एक संकट कोसळले आहे. रिपब्लिक टीव्हीच्या हिंदी चॅनेलवर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटर (युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉम) 20,000 पाउंड (जवळपास 20 लाख रुपये) दंड ठोठावला आहे.वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क लमिटेडच्या विरोधात आरोप आहे की,  6 सप्टेंबर 2019 या दिवसी 'पूछता है भारत' या कार्यक्रमात द्वेष पसरवणाऱ्या आणि अपमानाजनक भाषेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले आहे. या कार्यक्रमात नियम 2.3, 3.2 आणि 3.3 च्या नियमाचे  उल्लंघन झाले आहे. 

‘ॲपल’ची कार २०२४ पर्यंत रस्त्यावर

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटर ऑफकॉमच्या आदेशानुसार,  'पूछता है भारत' कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांबद्दल तिरस्कार निर्माण करणारा शब्दप्रयोग झाला. पाकिस्तानमधील लोकांना अपमानजक वाटेल, अशी भाष वापरली गेली. कोणाच्याही भावना दुखावणारे वक्तव्य हे ऑफकॉमच्या नजरेत गुन्हा आहे. हा कार्यक्रम पुन्हा प्रेक्षपित करु नये. तसेच नियमावलीचे पालन करावे, अशी सूचना वजा ताकीदही देण्यात आली आहे.

झाकीर नाइक यांच्या पीसी टीव्हीवर झाली होती दंडात्मक कारवाई 
यापूर्वी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटर ऑफकॉमने झाकिर नाइक यांच्या पीसी टीव्हीवर दंडात्मक कारवाई केली होती. इस्लामिक प्रसारक झाकीर नाइक यांच्यावर द्वेष पसरवणारे भाषण प्रेक्षपित केल्याच्या कारणास्तव 3 लाख पाउंडचा दंड ठोठावण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arnab Goswamis channel fined Rs 20 lakh by UK regulator for promoting hatred towards Pakistanis