‘ॲपल’ची कार २०२४ पर्यंत रस्त्यावर

वृत्तसंस्था
Wednesday, 23 December 2020

ॲपल कंपनीने तिच्या ‘टायटन’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या बॅटरीचा समावेश असलेली ही गाडी २०२४ पर्यंत रस्त्यावर आणण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.

न्यूयॉर्क - ॲपल कंपनीने तिच्या ‘टायटन’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या रणनीतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. सेल्फ ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेली आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेल्या बॅटरीचा समावेश असलेली ही गाडी २०२४ पर्यंत रस्त्यावर आणण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. ॲपलने या कारच्या बॅटरीसाठी स्वतःचे तंत्रज्ञान वापरले असल्याचे या प्रकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ॲपलने २०१४ पासूनच या प्रकल्पाला सुरवात केली होती. ॲपलच्या अधिकाऱ्यांनी शून्यातून या प्रकल्पाच्या उभारणीस सुरवात केली होती. या प्रकल्पाच्या  एका टप्प्यावर तर ॲपलला  माघार घेऊन पुन्हा सॉफ्टवेअरच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे लागले होते. टेस्लामधून आलेले  डोग फिल्ड यांच्याकडे २०१८ मध्ये या प्रकल्पाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांनी १९० लोकांना घरी पाठविले होते. यानंतर पुन्हा या प्रकल्पाची फेररचना करण्यात आली. आता थेट ग्राहकांना वापरता येईल अशा इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीपर्यंत कंपनीचे व्यवस्थापन येऊन ठेपले आहे. याच कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी असणाऱ्या अल्फाबेटच्या वेमोने रोबो टॅक्सीच्या निर्मितीवर भर दिला आहे.

कोरोनाच्या नव्या प्रकारावर BioNTech ने दिली दिलासादायक बातमी

माहिती गोपनीयच
ॲपलच्या कारमध्ये बॅटरीसाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान सर्वार्थाने वेगळे असेल. यामुळे बॅटरीची किंमत तर कमी होईलच पण त्याचबरोबर वाहनाची क्षमता देखील त्यामुळे वाढेल. दरम्यान कंपनीने मात्र या प्रकल्पाबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apple cars on the road by 2024