विजय मल्ल्या म्हणतो, चोर कोण तुम्हीच ठरवा

वृत्तसंस्था
रविवार, 14 जुलै 2019

मल्ल्याने लिहिले आहे, की माझा मित्र आणि युनिव्हर्स बॉसला भेटून आनंद झाला आहे. मला काहीजण चोर म्हणतात. पण त्यांनी आपल्या बँकाना विचारावे, गेल्या वर्षभरापासून मी सर्व पैसे द्यायला तयार आहे. त्यांना वारंवार तशी विनंतीही केली. मात्र, बँक पैसे का घेत नाही. त्यानंतरच मला चोर म्हणायचा निर्णय घ्यावा. तुम्हीच ठरवा नेमकं चोर कोण?

लंडन : भारतीय बँकांना कोट्यवधींचा चुना लावून परदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने एक ट्विट करत तुम्ही ठरवा चोर कोण असे म्हटले आहे.

लंडनमध्ये राहत असलेल्या विजय मल्ल्याचे क्रिकेटप्रेम सर्वांनाच परिचीत आहे. त्याने अनेकवेळा भारतीय संघाचे सामने पाहिले आहेत. लंडनमध्ये वेस्ट इंडिजचा धडकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने विजय मल्ल्याची भेट घेतली. विजय मल्याच्या भेटीचा फोटो गेलने सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोवर नेटकऱ्यांनी गेल आणि मल्ल्याला चांगलेच ट्रोल केले. विजय मल्ल्यानेही गेलने पोस्ट केलेल्या फोटोला रिट्विट करत हे वक्तव्य केले आहे. मल्ल्या भारतातील बँकांचे 9000 हजार कोटी घेऊन फरार झाला आहे.

मल्ल्याने लिहिले आहे, की माझा मित्र आणि युनिव्हर्स बॉसला भेटून आनंद झाला आहे. मला काहीजण चोर म्हणतात. पण त्यांनी आपल्या बँकाना विचारावे, गेल्या वर्षभरापासून मी सर्व पैसे द्यायला तयार आहे. त्यांना वारंवार तशी विनंतीही केली. मात्र, बँक पैसे का घेत नाही. त्यानंतरच मला चोर म्हणायचा निर्णय घ्यावा. तुम्हीच ठरवा नेमकं चोर कोण?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ask Your Banks Vijay Mallya On Being Trolled Over Chris Gayle