esakal | न्यूयॉर्कला 'इडा'चा तडाखा, 41 जणांचा मृत्यु
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूयॉर्कला 'इडा'चा तडाखा, 41 जणांचा मृत्यु

न्यूयॉर्कला 'इडा'चा तडाखा, 41 जणांचा मृत्यु

sakal_logo
By
नामदेव कुंभार

New York Storm Ida : अमेरिका (America) मध्ये इडा चक्रीवादळाने (Storm Ida) हाहा:कार माजवला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला (New York Flood) बसला आहे. येथील जनजिवन विस्कळीत झालं आहे. या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळत आहे. सुसाट्याच्या वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे न्यूयॉर्कमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. AFP या न्यूजसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इडा चक्रीवादळामुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. New York City flood

इडा चक्रीवादळामुळे विमानतळेही बंद करण्यात आली असून अनेक उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. इडाच्या प्रभामुळे पूर्वोत्तर अमेरिकेला मोठं नुकसान झालं आहे. इडा चक्रीवादळाचा धोका पाहाता प्रशासनाने न्यूयॉर्कमध्ये आपतकालीन परिस्थितीची घोषण केली आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, इडा चक्रीवादळामुळे न्यूयॉर्कमध्ये पूरस्थिती झाली आहे. अनेक गाड्या पाण्याखाली आहेत. घरांमध्ये पाणी साचलं आहे. पूरामुळे तळघरात अडकलेल्या आठ जणांचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. याशिवाय न्यू जर्सीमध्ये पाच जणांचा पूरस्थितीमुळे मृत्यु झाला आहे. आतापर्यंत इडा चक्रीवादळामुळे 41 जणांचा मृत्यु झाला आहे.

हेही वाचा: शाळा कधी सुरु होणार?, अजित पवारांनी दिलं उत्तर

मुसळधार पावसामुळे न्यूयॉर्कमधील एफडीआर ड्राइव्ह आणि ब्रोंक्स रिव्हर पार्कवे पाण्याखाली गेलं आहे. सबवे स्थानकावर आणि रुळावरही पाणी साठलं आहे. त्यामुळे रेल्वे आणि मेट्रो स्थगित करण्यात आल्या आहेत. या पूरस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासियो यांनी पूरस्थितीचा धोका पाहून बुधवारी रात्री शहरात आपतकालीन स्थितीची घोषणा केली. ते म्हणाले की, 'विक्रमी पाऊस, पूरस्थितीचा आपण सामना करत आहोत. या नैसर्गिक आपत्तीपासून लवकरच सावरु.' गवर्नर कैथी होचुल यांनी न्यूयॉर्क प्रांतामध्ये आपतकालीन स्थितीची घोषणा केली.

loading image
go to top