नायजेरियात मशिदीवर हल्ला, तब्बल 16 भाविक ठार

crime
crimeesakal

उत्तर नायजेरियातील (Nigeria) एका गावात, बंदुकधारींनी (attack on mosque) मशिदीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तब्बल 16 हून अधिक भाविक ठार झाल्याचे समजते. यासोबतच काही भाविकांचे अपहरण केल्याचे वृत्तही समजत आहे. नायजर राज्यातील बारे गावात गुरुवारी हा हल्ला झाला.

नमाज पठण करत असलेल्या उपासकांची हत्या

स्थानिक नेते अल-हसन इसा माझौका यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकलवर आलेले हल्लेखोर गावात घुसले, आणि मशिदीत नमाज पठण करत असलेल्या उपासकांची हत्या केली. तसेच त्यांचे सामानही लुटले. हल्लेखोरांनी गावातही तोडफोड केली. त्यांनी16 लोकांची हत्या केली आणि अनेकांचे अपहरण केले.

crime
MIMच्या रॅलीला परवानगी नाही; Omicron मुळं मुंबईत जमावबंदी

दुसऱ्या घटनेत बस जाळली, किमान 23 प्रवासी ठार

नायजेरिया पोलिसांनी या घटनेची पुष्टी केली, परंतु मृतांची संख्या केवळ नऊ आहे. दुसऱ्या एका घटनेत, कॅटसिना प्रांतात एका सरकारी अधिकाऱ्याची त्याच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. राबे नसीर नावाचे हे अधिकारी राज्याचे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकरणांचे आयुक्त होते. या हत्येचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आठवड्याच्या सुरुवातीला, बंदुकधारींनी सोकोटो प्रांतात बसवर हल्ला केला, ज्यात किमान 23 प्रवासी ठार झाले. बसमध्ये जळून त्याचा मृत्यू झाला.

crime
शिक्षणात अडथळा नको; मुस्लीम धर्मियांनी केला मशिदीवरचा भोंगा बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com