esakal | ऑस्ट्रेलियाचा चीनला दणका; 'बेल्ट अँड रोड' प्रोजेक्ट केला रद्द

बोलून बातमी शोधा

xi jinping

ऑस्ट्रेलियाचा चीनला दणका; 'बेल्ट अँड रोड' प्रोजेक्ट केला रद्द

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कॅनबरा- जगभरातील देशांसोबत पंगा घेणाऱ्या चीनला ऑस्ट्रेलियाने दणका दिला आहे. प्रतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या कॅबिनेटने राष्ट्रीय सुरक्षेला लक्षात घेत चीनच्या महत्वकांक्षी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव कराराला रद्द केले आहे. ज्या दोन कराराला रद्द करण्यात आले आहे, त्यातील एक चिनी कंपन्या ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया प्रांतामध्ये दोन बिल्डिंग इंफ्रास्ट्रक्चर तयार करणार होत्या. ऑस्ट्रलियाचे परराष्ट्र मंत्री मारिस पायने यांनी सांगितलं की, चीनसोबत हा करार 2018 आणि 2019 मध्ये करण्यात आला होता. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला लक्षात घेऊन चीनच्या महत्वकांक्षी प्रोजेक्टला रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये संबंध ताणले गेल्यानंतर चीनने यामुळे व्यावहारिक सहकार्य बाधित होण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियानेही चीनला धडा शिकवला असून हा करार रद्द केला आहे. ऑस्ट्रेलियाने 2018 मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. त्यामुळे देशाच्या अंतर्गत नीतीमध्ये विदेश हस्तक्षेपाला प्रतिबंध करण्यात आला आहे. बिजिंगने या कायद्यांचा विरोध केला असून यामुळे चीन-ऑस्ट्रेलिया संबंध बिघडतील असा इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: जगासमोरील संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिका-चीन आले एकत्र

काही दिवसांपूर्वी चीनमधील ऑस्ट्रेलियाचे राजदूत ग्राहम फ्लेचर यांनी बीजींगला बदला घेणारा आणि अविश्वासू व्यापारी भागिदार असल्याचं म्हटलं होतं. दोन्ही देशांतील तणावाच्या स्थितीमुळे ऑस्ट्रेलियातून चीनमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये मोठी घसरण झाली आहे. मागील वर्षापासून कोरोना महामारी हाहाकार माजवत आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाने जगात थैमान घालणाऱ्या विषाणूबद्दल तपास करण्याची मागणी केली होती. शिवाय चीनला यासाठी जबाबदार धरलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: भारतासाठी धोक्याची घंटा; चीन तिबेटमध्ये उभारणार जगातील सर्वांत मोठं धरण

ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगसोबत प्रत्यार्पन करार रद्द केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँग आपल्या अधिकार क्षेत्रातील कोणात्याही व्यक्तीचे प्रत्यार्पन करु शकणार नाही. याशिवाय ऑस्ट्रेलियाने हाँगकाँगच्या नागरिकांना आपल्या देशात येऊन राहण्याची ऑफर दिली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जाहीर केलंय की, हाँगकाँगमध्ये व्यवसाय करणारे लोक ऑस्ट्रेलियामध्ये बिनदिक्कत येऊ शकतात.