चीनशी संबंध महत्त्वपूर्ण; ऑस्ट्रेलियाची अमेरिकेकडे स्पष्टोक्ती

वृत्तसंस्था
Thursday, 30 July 2020

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मारीसी पायने आणि संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांच्याशी दोन दिवस चर्चा केली.

वॉशिंग्टन - चीनबरोबरील संबंध महत्त्वपूर्ण असून ते बिघडविण्याचा कोणताही इरादा नसल्याचे ऑस्ट्रेलियाने अमेरिकेला स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी उच्चस्तरीय संयुक्त परिषदेत हे स्पष्ट करण्यात आले.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री मारीसी पायने आणि संरक्षण मंत्री लिंडा रेनॉल्ड्स यांच्याशी दोन दिवस चर्चा केली. कोरोनाची साथ असूनही मारीसी आणि लिंडा  या दोघींनी विविध देशांचे दौरे केले. मायदेशी परतल्यानंतर त्या दोन आठवड्यांसाठी क्वारंटाइन करणार आहेत. जागतिक पातळीवरील रचना नियमांवर आधारीत राहण्याची गरज असल्याविषयी ऑस्ट्रेलियाने सहमती दर्शविली, पण चीनबरोबरील संबंध महत्त्वाचे असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. संयुक्त पत्रकार परिषदेत पॉम्पिओ यांनी सांगितले की, चीनच्या दडपणानंतरही ठाम राहिल्याबद्दल आम्ही ऑस्ट्रेलियाची प्रशंसा करतो. चीन आक्रमकपणे दावा करीत असलेल्या दक्षिण चिनी समुद्रात कायद्याचे पालन व्हावे म्हणून उभय देश एकत्रित प्रयत्न सुरु ठेवतील. चीनच्या दाव्यांमुळे देशांशी संघर्ष होत आहे. मुक्त सागरी संचाराबद्दलही चिंता निर्माण झाली आहे.  अमेरिकेशी मतभेदाचे कोणते मुद्दे आहेत, याचा तपशील मारीसी यांनी दिला नाही, पण ऑस्ट्रेलियाचे स्वतःचे निर्णय स्वतः घेतो आणि राष्ट्रीय हित आणि सुरक्षेवर ते अवलंबून असते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यापारातील भागीदारी
ऑस्ट्रेलियासाठी संरक्षण क्षेत्रात अमेरिका हा मुख्य भागीदार आहे, तर व्यापारात चीनबरोबर सर्वाधिक देवाणघेवाण आहे. कोरोनाची साथ सर्वप्रथम चीनमध्ये सुरु झाल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय चौकशी व्हावी अशी आग्रही मागणी सर्वप्रथम केलेल्या देशांत ऑस्ट्रेलियाचा समावेश होता. त्यामुळे चीन-ऑस्ट्रेलिया संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर चीनने ऑस्ट्रेलियाला झटका दिला. ऑस्ट्रेलियातून आयात केल्या जाणाऱ्या सातूवर चढ्या दराने आयातकर लावण्यात आला. गोमांस आयातही थांबविण्यात आली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia has made it clear to the United States that relations with China