Australia Student Visa: भारतीय विद्यार्थी चिंतेत! ऑस्ट्रेलियाने व्हिसासाठीच्या बँक बॅलन्समध्ये केली वाढ; नेमका काय परिणाम होणार?

Australia Student Visa: आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आता किमान बचतीचा पुरावा दाखवावा लागेल. 2023 पासून कठोर नियमांमुळे देश-विदेशातील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. ऑस्ट्रेलिया इमिग्रेशनला आळा घालण्याचा प्रयत्न करत आहे.
Australia increases bank balance for visa What exactly will be the effect on Indian students
Australia increases bank balance for visa What exactly will be the effect on Indian studentsesakal

Australia Student Visa:

ऑस्ट्रेलियात शिक्षण घेणाऱ्या देश-विदेशातील विद्यार्थ्यांना मोठ्या आर्थिक अडथळ्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टुडंट व्हिसासाठी आवश्यक असलेल्या बँक बॅलन्समध्ये वाढ करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन स्टुडंट व्हिसा मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या बचतीच्या रकमेमध्ये यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये वाढ करण्यात आली होती.

ऑस्ट्रेलियाने परदेशी विद्यार्थ्यांना व्हिसा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान बचतीत वाढ केली आहे. 10 मे 2024 पासून, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांचा व्हिसा मिळविण्यासाठी किमान ऑस्ट्रेलियन डॉलर 29,710 च्या बचतीचा पुरावा दाखवावा लागेल. ऑक्टोबरमध्ये, किमान बचत रक्कम ऑस्ट्रेलियन डॉलर 21,041 वरून ऑस्ट्रेलियन डॉलर 24,505 पर्यंत वाढवली आहे. सात महिन्यांतील ही दुसरी वाढ आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने परदेशी नागरिक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे इमिग्रेशन कायदे बदलले आहेत. ऑस्ट्रेलियन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणारे संभाव्य विद्यार्थी आणि तेथे शिकणारे सध्याचे विद्यार्थी या दोघांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे. (Education News News in Marathi)

भारतीय विद्यार्थ्यांना देणाऱ्या व्हिसामध्ये 48 टक्के घसरण -

एक अहवालानुसार डिसेंबर 2022 आणि डिसेंबर 2023 च्या दरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना देणाऱ्या व्हिसामध्ये 48 टक्के घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी नोंदणीसाठी भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. जानेवारी-सप्टेंबर 2023 या कालावधीत 1.22 लाख भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिकत होते. तर सरकार फसव्या शिक्षण पुरवठादारांवर सरकार कारवाई करत आहे.

2022 मध्ये कोविड-19 निर्बंध शिथिल झाल्यानंतर बरेच लोक ऑस्ट्रेलियाला गेले. यामुळे घरांच्या समस्या देखील निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे सरकारने विद्यार्थी व्हिसा धोरण कठीण केले आहे.

गृहमंत्री क्लेअर ओ नील म्हणाले, "34 शिक्षण संस्थांना इशारा दिला आहे. दोषी आढळल्यास त्यांना तुरुंगवास आणि विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यावर बंदी यांसह गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते."

"आमच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात  प्रदात्यांना कोणतेही स्थान नाही. या कृतींमुळे लोकांचे शोषण करणाऱ्या आणि या क्षेत्राची प्रतिष्ठा खराब करू पाहणाऱ्या क्षेत्रातील तळाशी फीडर्सना बाहेर काढण्यात मदत होईल," ओ नील यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

Australia increases bank balance for visa What exactly will be the effect on Indian students
PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com