ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचं भारताशी जुनं नातं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अँथनी अल्बानीज

ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचं भारताशी जुनं नातं

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा निवडणुकीत पराभव झाला आणि अँथनी अल्बानीज यांचा विजय झाला आहे. ते लवकरच ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बनणार असलेल्या अँथनी अल्बानीज यांची भारताची चांगली ओळख असल्याचं ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ'फॅरेल यांनी शनिवारी सांगितलं.

(Australia's New PM Anthony Albanese Relation With India)

ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकांत लेबर पार्टीने 2007 नंतर पहिल्यांदा निवडणुका जिंकल्या आहेत आणि त्यानंतर आता अँथनी अल्बानीज पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ'फॅरेल यांनी ट्वीट करत होणाऱ्या पंतप्रधानांचे भारताशी असलेले जुने नात्याच्या आठवणी जागवल्या आहेत.

त्यांनी ट्वीट करत सांगितलं की, "ऑस्ट्रेलियाचे निवडून आलेले पंतप्रधान अँथनी अल्बानीज हे भारतासाठी अनोळखी नाहीत कारण त्यांनी 1991 मध्ये प्रवासी म्हणून भारताला भेट दिली आणि 2018 मध्ये संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्यांच्या 2018 च्या भेटीदरम्यान, त्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक धोरणात्मक संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध केले होते." या आठवणी सांगत त्यांनी भारतासोबतचे संबंध सांगितले.

हेही वाचा: LIVE : पोरकटपणा लावलाय का?, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

जर अल्बानीज आगामी क्वाड नेत्यांच्या बैठकीला टोकियोत उपस्थित राहिले तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. क्वाड समिट 24 मे रोजी होणार असून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत दृढ झाले आहेत. गेल्या महिन्यात दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. तसेच जून 2020 मध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलियाने सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीसाठी त्यांचे संबंध वाढवले ​​आणि लॉजिस्टिक सहाय्यासाठी लष्करी तळांवर परस्पर प्रवेशासाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे.

Web Title: Australia New Pm Anthony Albanese Old Relation With India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top