एका पक्ष्याने अडवला अदानींचा कोळसा प्रकल्प

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 मे 2019

उद्योगपती गौतम अदाणी यांना ऑस्ट्रेलियाच्या सरकारने मोठा झटका देत कोळसा प्रकल्पाच्या मान्यतेसाठी नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या एका पक्ष्याच्या जतनासाठी अदानींच्या प्रकल्पाला नकार दिला आहे. 

मेलबर्न : उद्योगपती गौतम अदाणी यांना ऑस्ट्रेलियाच्या सरकारने मोठा झटका देत कोळसा प्रकल्पाच्या मान्यतेसाठी नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्याने नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या एका पक्ष्याच्या जतनासाठी अदानींच्या प्रकल्पाला नकार दिला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार पर्यावरण विभागाच्या अहवालानुसार क्वीन्सलँड सरकाने अदाणी समूहाचा कारमायकल कोळसा खाण प्रकल्प थांबविला आहे. पर्यावरण खात्यानुसार या खाणीमुळे तेथील लुप्त होणारी पक्ष्याची प्रजाती नष्ट होऊ शकते. यामुळे अदाणी समुहाचा हा प्रकल्प रद्द करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे पाण्याचे प्रदुषण होणार असल्याचाही आरोप होत असल्यामुळे याचा अभ्यास तेथील सरकार करत आहे. यामुळे या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियातील सरकारकडून नकार देण्यात आला आहे.

सध्याच्या परिस्थितीनुसार या प्रकल्पाला मंजुरी देणे अशक्य असल्याचेही तपासणी अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले आहे. यानंतर अदाणीच्या ऑस्ट्रेलियातील कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुन्हा नव्या प्रस्तावाद्वारे प्रकल्पासाठी सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रेलियातील पर्यावरण विभागाच्या म्हणण्यानुसार या भागात काळा गळा असणाऱ्या पक्ष्यांची एक मोठी प्रजाती वास्तव्य करते. जी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे कंपनीला त्यांच्या योजनेबाबत पुन्हा विचार करायला हवा. महत्वाचे म्हणजे क्वीन्सलँड हे कोळसा खाणींमुळे वादात राहिलेले राज्य आहे. मात्र, अदाणींच्या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियाच्या संघ सरकारची मंजुरी मिळाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australia state govt rejects Adanis plan to protect endangered bird species