esakal | 'भारताची चिकाटी आणि सामर्थ्य जाणतो'; कोरोनाविरोधातील लढ्यात ऑस्ट्रेलिया भारतीयांसोबत

बोलून बातमी शोधा

'भारताची चिकाटी आणि सामर्थ्य जाणतो'; 
कोरोनाविरोधातील लढ्यात ऑस्ट्रेलिया भारतीयांसोबत

'भारताची चिकाटी आणि सामर्थ्य जाणतो'; कोरोनाविरोधातील लढ्यात ऑस्ट्रेलिया भारतीयांसोबत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचं मोठं संकट उभं आहे. या कोरोनाच्या विळख्यात देशातील अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. देशाची सध्याची परिस्थिती चिंताजनक बनली असून देशात दिवसाला जवळपास तीन लाखांच्या वर रुग्ण सापडत आहेत. भारतातील या परिस्थितीबाबत संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्ताननंतर आता ऑस्ट्रेलियाने देखील चिंता आणि काळजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलंय की, सध्या भारत कोरोनाच्या भयावह दुसऱ्या लाटेशी झगडतो आहे, त्यासाठी ऑस्ट्रेलिया भारतातील आपल्या मित्रांसबोत उभा आहे. आम्ही जाणतो की, भारत किती सामर्थ्यवान आणि चिकाटी असणारा देश आहे ते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मी या जागतिक आव्हानाशी एकत्र येऊन लढा देऊ.

पाकिस्ताननेही व्यक्त केली सहानुभूती

याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील ट्विट करत भारताबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. मी भारतीय नागरिकांसोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय. मी भारतीय नागरिकांसोबत आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या भयावह लाटेशी लढा देत आहे. आमच्या शेजारच्या देशात तसेच जगामध्ये या महासाथीदरम्यान विषाणूशी झुंज देणारे सगळेच लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना करतो. मानवतेला आव्हान देणारे हे जागतिक संकट आपण सगळ्यांनी एकत्र येऊन परतवून लावायलाच हवे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

#PakistanWithIndia हॅश्टॅग ट्रेंड

यासंदर्भात पाकिस्तानातील नागरिकांनीही भारताविषयी काळजी व्यक्त केली आहे. या संकटाच्या समयी पाकिस्तानने भारताला मदत करावी, अशी मागणी पाकिस्तानी नागरिकांकडून करण्यात येत आहे. #IndianLivesMatter #IndiaNeedOxygen #PakistanWithIndia असे हॅश्टॅग ट्रेड करत आहेत. या दरम्यानच पाकिस्तानचे समाजवेक अब्दुल सत्तार इदी यांचा मुलगा फैजल इदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. त्यांनी भारतातील वाढत्या कोरोना संक्रमणाबाबत चिंता व्यक्त केली आहे तसेच मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फैजल यांनी आपल्या पत्रात लिहलंय की, हम इदी फाउंडेशनमध्ये भारतातील कोरोनाचा हाहाकार पाहत आहोत. मोठ्या संख्येने लोक कोरोनाच्या विळख्यात अडकत असल्याचं पाहून आम्ही चिंतीत आहोत. त्यांनी पुढे याबाबत संवेदना व्यक्त करत सोबतच 50 ऍब्युलन्स देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.