अझरबैजान-आर्मेनियामधला संघर्ष पुन्हा पेटला; हल्ल्यात तीन सैनिक ठार, अनेक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Azerbaijan and Armenia War

अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये पुन्हा एकदा तणाव सुरू झालाय.

अझरबैजान-आर्मेनियामधला संघर्ष पुन्हा पेटला; हल्ल्यात तीन सैनिक ठार, अनेक जखमी

येरेवन, आर्मेनिया : अझरबैजान (Azerbaijan) आणि आर्मेनियामध्ये (Armenia) पुन्हा एकदा तणाव सुरू झालाय. नागोर्नो-कारबाख भागात दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये संघर्ष (Azerbaijan and Armenia War) झाला असून या हल्ल्यात तीन जवान शहीद झाल्याची माहिती आहे.

एपी या वृत्तसंस्थेनं याबाबत सविस्तर माहिती दिलीय. अझरबैजान लष्करानं (Azerbaijan Army) ड्रोन हल्ले केल्याचा दावा नागोर्नो-कारबाखमधील लष्करी (Nagorno-Karabakh Army) अधिकाऱ्यांनी केलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या हल्ल्यात त्यांचे दोन सैनिक ठार झाले असून 14 जण जखमी झाले आहेत.'

हेही वाचा: धक्कादायक! दुसऱ्या तरुणाकडून लिफ्ट घेतली म्हणून पत्नीला झाडाला बांधून मारहाण

दरम्यान, अझरबैजाननं आर्मेनियन सैनिकांवर (Armenian Soldiers) हल्ल्याचा आरोप केलाय. अझरबैजानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की, आर्मेनियन सैन्यानं केलेल्या बेकायदेशीर दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) त्यांच्या देशाचा एक सैनिक मारला गेलाय. अझरबैजाननं आर्मेनियन सैनिकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं असून प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात आर्मेनियन दहशतवादी मारले गेल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय. या हल्ल्यात काही जण जखमीही झाले आहेत.

हेही वाचा: आता Sprite ची बाटली हिरव्या रंगाची नाही, तर पांढऱ्या रंगाची असणार!

नागोर्नो-कारबाखचा वाद जुनाच!

नागोर्नो-कारबाख या दोन देशांमधील वाद बराच जुना आहे. हे क्षेत्र सध्या अझरबैजानमध्ये आहे. तथापि, 1994 पासून आर्मेनियाचं नियंत्रण आहे. 2020 मध्ये या भागात युद्धही झालं होतं. या युद्धात 6600 हून अधिक लोक मारले गेले. 6 आठवडे चाललेल्या या युद्धानंतर रशियानं मध्यस्थी करून दोन्ही देशांमध्ये शांतता करार केला. तद्नंतर रशियानं या भागात दोन हजारांहून अधिक सैनिक पाठवले होते.

Web Title: Azerbaijan And Armenia Resume War Three Soldiers Killed In Terrorist Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..