इस्लामाबाद : बलुचिस्तानमधील संघर्ष आणखी तीव्र झाला असून, बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी सैन्याविरोधात जोरदार कारवाया केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत झालेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे ५० पाकिस्तानी सैनिक (Pakistan Military) आणि आयएसआयसह अन्य गुप्तचर संस्थांचे ९ एजंट ठार झाल्याचे समोर आले आहे.