'पाकपासून बलुचिस्तान स्वातंत्र्य झाल्यास पहिली मूर्ती मोदींची उभारू'

वृत्तसंस्था
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

बलुचिस्तानमधील नागरिक आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. मोदींनी कलम 370 बद्दल जो धाडसी निर्णय घेतला त्याविषयी जगातील कोणत्याही देशाने आक्षेप घेतला नाही. पाकिस्तान गेल्या 70 वर्षांपासून आमच्यावर अन्याय करत आहे. त्यामुळे मोदीच आमचे हिरो आहेत.

पेशावर : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर आता पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वातंत्र्य व्हावे ही मागणी जोर धरू लागली आहे. यासाठी आज (14 ऑगस्ट) पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी ट्विटरवर #BalochistanSolidarityDay हा ट्रेंड सुरु आहे.

कलम 370 हटविल्यानंतर बलुचिस्तानमधील नागरिकांनी आनंद साजरा केला होता. बलुचिस्तानमधील महिला नेत्या नायला कादरी यांनी पाकिस्तानपासून बलुचिस्तान स्वातंत्र्य  झाल्यानंतर येथे पहिली मूर्ती पंतप्रधान मोदींची उभारण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. पाकिस्तान चीनच्या साथीने बलुच नागरिकांना संपविण्याचा प्रय़त्न करत आहे. मोदी हे खरे हिरो आहेत. पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये खूप नरसंहार केला आहे. 

बलुचिस्तानमधील नागरिक आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. मोदींनी कलम 370 बद्दल जो धाडसी निर्णय घेतला त्याविषयी जगातील कोणत्याही देशाने आक्षेप घेतला नाही. पाकिस्तान गेल्या 70 वर्षांपासून आमच्यावर अन्याय करत आहे. त्यामुळे मोदीच आमचे हिरो आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मदत केली, तर त्याने खूप फायदे होतील, असे नायला कादरी यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baloch population demands to free from Pakistan