रशियाच्या तेलावर टप्प्याटप्प्यांत बंदी; जी-७ गटातील देशांचा एकमताने निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ban on Russian oil Decision of G-7 countries Volodymyr Zelenskyy

रशियाच्या तेलावर टप्प्याटप्प्यांत बंदी; जी-७ गटातील देशांचा एकमताने निर्णय

लंडन : ‘जी-७’ या गटातील विकसित देशांनी रशियाकडून तेलाची आयात टप्प्याटप्प्यांत बंद करण्याचा किंवा तत्काळ आयात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनला समर्थन व्यक्त करण्यासाठी आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की हे देखील उपस्थित होते.दुसऱ्या महायुद्धात १९४५ मध्ये नाझी जर्मनीने शरणागती पत्करल्याची आठवण म्हणून युरोपमध्ये आज ‘युरोप दिन’ साजरा केला जातो. या दिवशी एकतेचे प्रदर्शन करत जी-७ देशांनी रशियाची आणखी कोंडी करण्याचा निर्णय घेतला.

तेल निर्यातीतून रशियाला प्रचंड पैसा मिळत असल्याने त्यांचा हा उत्पन्नाचा स्रोतच बंद करून आर्थिक नस दाबण्याचा जी-७ देशांचा इरादा आहे. जी-७ देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान यांचा समावेश आहे. रशियाकडून तेल आयात टप्प्याटप्प्यांत बंद करून पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाईल, असे या गटाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. युक्रेन युद्धात पुतीन यांचा विजय होणार नाही, यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘दुसऱ्या महायुद्धात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्वांचे स्मरण ठेवून आपण त्याच कारणासाठी लढायला हवे. ही लढाई युक्रेनसाठी, युरोपसाठी आणि जगासाठी आहे,’ असे म्हटले आहे.

Web Title: Ban On Russian Oil Decision Of G 7 Countries Volodymyr Zelenskyy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top