मांजर, कुत्र्याचे मांस खाण्यास अमेरिकेत बंदी 

पीटीआय
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

वॉशिंग्टन : भोजनासाठी मांजर, कुत्र्याची कत्तल करण्यास बंदी घालणारे विधेयक अमेरिकी प्रतिनिधीगृहाने बुधवारी मंजूर केले. कुत्रा तसेच मांजर मांस व्यापारविरोधी कायदा 2018 चा भंग केल्यास 5 हजार अमेरिकी डॉलर (सुमारे 3.50 लाख रुपये) रकमेचा दंड ठोठावला जाणार आहे. 

अन्य एका प्रस्तावात संसदेने चीन, दक्षिण कोरिया आणि भारतासह सर्व देशांना मांजर आणि कुत्र्याच्या मांसाचा व्यापार बंद करण्याची विनंती केली आहे. 

कॉंग्रेस सदस्य क्‍लाउडिया टेनी यांनी सांगितले, की मांजर आणि कुत्री सहकारी तसेच मनोरंजनासाठी असतात. दुर्दैवाने चीनमध्ये दरवर्षी मनुष्याच्या भोजनासाठी एक कोटीपेक्षा अधिक कुत्री मारली जातात. 

ते म्हणाले, की या गोष्टीसाठी आपल्या करुणामय समाजात कोणतेही स्थान नाही. हे विधेयक अमेरिकेच्या तत्त्वांना प्रतिबिंबित करते आणि सर्व देशांना एक कठोर संदेश देत आहे की आम्ही या अमानवीय आणि क्रूर वर्तनाला साथ देणार नाही. 

भारतासह अनेक देशांनाही विनंती 

अमेरिकेच्या संसदेच्या प्रस्तावात चीन, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, कंबोडिया, लाओस, भारत आणि अन्य देशांच्या सरकारांना मांजर आणि कुत्र्यांच्या मांसाच्या व्यापारावर बंदी घालणाऱ्या कायद्याचा अवलंब करणे आणि तो लागू करण्याची विनंती करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ban in the US to eat cat dog meat