
सोमवारी ढाका येथील उत्तरा येथे हवाई दलाचे F7 विमान कोसळले. विमान माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या इमारतीला धडकले. अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षण विभागाने या घटनेत किमान एकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. बांगलादेश हवाई दलाचे हे विमान होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.