
सोमवारी दुपारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील उत्तरा परिसरातील मिलस्टोन स्कूल अँड कॉलेजमध्ये एक लढाऊ विमान कोसळले. या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला, ज्यात १६ विद्यार्थी, २ शिक्षक आणि पायलट यांचा समावेश आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पायलटचे नाव फ्लाइट लेफ्टनंट मोहम्मद तौकीर इस्लाम असे आहे. अपघाताच्या वेळी तो नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होता. या अपघातात १६० लोक जखमी झाले आहेत.