बांगलादेशमधील शाळेत बुरख्यावर बंदी; लोकांची निदर्शने

बांगलादेशमधील एका शाळेत विद्यार्थिनींना बुरखा घालून बसण्यास बंदी घालण्यात आली होती.
burqa
burqaSakal

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य असल्याचा निर्णय कर्नाटक हायकोर्टाने दिला. आता शेजारील बांगलादेशातील एका शाळेतही विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. बांगलादेशातील नोआखली येथील सेनबाग येथील शाळेत ही बंदी घालण्यात आली आहे. शाळेच्या या आदेशानंतर ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, शाळेने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, वर्गात प्रवेश केल्यानंतर मुलींनी तोंड झाकता येणार नाही. परंतु नंतर व्यवस्थापनाने ही नोटीस मागे घेतली. (Bangladesh bans burqas in schools; Demonstrations by people outside the school)

burqa
"हिजाब घालून फिरणाऱ्या इतर राज्यात आपली मुलगी पाठवणार का?”

या घटनेला दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ झाला. असे असूनही लोक विरोध करत आहेत. हातात पोस्टर-बॅनर घेऊन लोक टीका करत आहेत. बीबीसीने आपल्या अहवालात स्थानिक लोकांच्या हवाल्याने म्हटले आहे की, शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीमुळे हा मुद्दा उपस्थित झाला आहे. मात्र, या नोटिशीचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. समज गैरसमजांमुळे ही नोटीस मागे घेण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापनाने घेतला.

शाळेबाहेर मानवी साखळी करून लोकांनी निषेध व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला. त्याचवेळी एका स्थानिक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलींच्या वर्गात मुलं बुरखा घालून येण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुलींच्या सुरक्षेचा विचार करून शाळा प्रशासनाने असा निर्णय घेतला. शाळा व्यवस्थापनाने वर्गात प्रवेश केल्यानंतर चेहरा झाकून ठेवू नये, असे आदेश दिले आहेत. बुरखा न घालण्याबाबत किंवा त्यावर बंदी घालण्याबाबत नोटीसमध्ये काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कधी कधी शाळेत न शिकलेल्या मुलीही वर्गात यायच्या.

burqa
हिजाब वाद पुन्हा उफाळला; मुस्लिमांना जत्रेत दुकान लावण्यावर बंदी

बीबीसीने आपल्या अहवालात शाळा व्यवस्थापनाच्या हवाल्याने म्हटले आहे की, मुलांनी शाळेजवळील एका बाजारात अड्डाच बनवला होता. त्यावर बाजार समितीने कारवाई केली. यानंतर त्या मुलांनी शाळेला आपला अड्डा बनवला. मुलींच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही वर्गात चेहरा झाकू नये असा आदेश काढला. या संपूर्ण प्रकरणावर लेखिका तस्लिमा नसरीन म्हणाल्या, “नोआखली येथील शेर-ए-बांगला हायस्कूलचे मुख्याध्यापक मोझम्मेल हुसैन यांनी वर्गात बुरख्यावर बंदी घातली होती. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या निर्णयाला बुरखा समर्थक लोकांनी विरोध केला. मुख्याध्यापक म्हणाले की त्यांनी वर्गात बुरख्यावर बंदी घातली कारण अज्ञात पुरुष आणि बाहेरील लोक वर्गात प्रवेश करण्यासाठी बुरखा घालू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com