Bangladesh Workers Protest
esakal
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशातील वस्त्रोद्योग कामगारांनी आंदोलन सुरू केलं आहे. राजधानी ढाका आणि गाझीपूरमध्ये हजारो कामगार रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस आणि आंदोलकांमध्येही झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी औद्योगिक भागांत मोठ्या संख्येने पोलीस आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) जवान तैनात करण्यात आले आहेत.