
दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या हत्येप्रमाणंच बांगलादेशात भीषण हत्येची घटना समोर आलीय.
दिल्लीतील श्रद्धा वालकरच्या हत्येप्रमाणंच (Shraddha Walker Murder Case) बांगलादेशात (Bangladesh) भीषण हत्येची घटना समोर आलीय. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला (Aftab Poonawalla) यानं 18 मे रोजी श्रद्धाची हत्या करून तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. अशाच पद्धतीनं बांगलादेशातही एका हिंदू मुलीच्या निर्घृण हत्येचं प्रकरण समोर आलंय.
अबू बकर (Abu Bakar) आणि कविता राणी यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर अबू बकरनं तिला ठार मारलं. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन तिला नाल्यात फेकून दिलं. याशिवाय, धडापासून डोकं वेगळं करून पॉलिथिनमध्ये पॅक करून भाड्याच्या घरात ठेवलं.
6 नोव्हेंबरला अबू बकर कामावर न आल्यानं ट्रान्सपोर्ट फर्मच्या मालकानं एका कर्मचाऱ्याला त्याच्या घरी तपासण्यासाठी पाठवलं. अबू बकर तिथं सापडला नाही आणि त्याच्या घराला बाहेरून कुलूप लावलं होतं. ही बाब मालकाला कळताच त्यांनी अबू संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराचं कुलूप तोडलं आणि फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आला. ज्याचं शीर कापून पॉलिथिनमध्ये वेगळं पॅक केलं होतं.
या खळबळजनक गुन्ह्यानंतर पोलिसांनी अबू बकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी अबूसह त्याची लिव्ह-इन पार्टनर सपनाला अटक केलीय. बांगलादेश रॅपिड अॅक्शन बटालियनच्या (RAB) अधिकाऱ्यानं सांगितलं की, अबू बकर आणि सपना गोबरचाका हे दोघंही गेल्या 4 वर्षांपासून एकत्र राहत होते. दोघं 5 दिवसांपूर्वीच एकमेकांना भेटले होते. यादरम्यान ते एकमेकांच्या खूप जवळ आले. यानंतर अबूनं कविताचा काटा काढत तिला ठार केलं आणि तिच्या शरीराचे अनेक तुकडे करुन नाल्यात फेकून दिले.
5 नोव्हेंबरला सपना कामावर असताना अबू बकरनं कविताला घरी बोलावलं होतं. पण, सपना कामावरून परत आली आणि तिच्यात आणि अबूमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर अबूनं कविताचा गळा दाबून खून केला. त्यानं शरीरापासून तिचं शीर कापलं. तिच्या हाताचे अनेक तुकडे करून नाल्यात फेकले. त्यानंतर तिचं डोकं पॉलिथिनच्या पिशवीत कोंबलं आणि शरीराचे उर्वरित अवयव एका बॉक्समध्ये भरले. यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.