Bangladesh Hindu journalist shot dead: बांगलादेशात आता भरबाजारात हिंदू पत्रकाराची गोळ्या झाडून हत्या!

Bangladesh journalist murder: या घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Hindu Journalist Shot Dead in Bangladesh

Hindu Journalist Shot Dead in Bangladesh

esakal

Updated on

Hindu Journalist Shot Dead in Bangladesh : बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंच्या हत्येच्या घटना सुरूच आहेत. आता आणखी एक घटना समोर आली आहे.  जशोर जिल्ह्यातील मणिरामपूरम येथील कोपलिया बाजार परिसरात कट्टरपंथीयांनी राणा प्रताप नावाच्या हिंदू पत्रकाराची भरदिवसा निर्घृणपणे गोळ्या घालून हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, हल्लेखोर हे दुचाकीवरून आले होते. त्यांनी राणा यांना त्याच्या बर्फाच्या कारखान्यातून बाहेर काढले आणि बाजारपेठेतील एका क्लिनिकजवळील रस्त्यावर नेले. तिथे त्यांच्यात थोडा वाद झाला, त्यानंतर हल्लेखोरांनी राणा यांच्या डोक्याला लक्ष्य करून अनेक गोळ्या झाडल्या. यानंतर हल्लेखोर मणिरामपूरच्या दिशेने पळून गेले.

पोलिसांनी घटनास्थळावरून फायर झालेल्या सात गोळ्यांची आवरणं आढळली, ज्यामुळे हल्ल्याची तीव्रता दिसून येते. या हत्येनंतर, परिसरातील हिंदू समुदायात व्यापक संताप आणि दहशत पसरली आहे. स्थानिक प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे, परंतु मारेकऱ्यांची ओळख पटवण्याबाबत किंवा अटक करण्याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

Hindu Journalist Shot Dead in Bangladesh
Attack on US Vice President Residence : मोठी बातमी! अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील घरावर हल्ला

घटनेबाबत,  पोलिस म्हणाले, "आम्हाला बातमी मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींचा शोध घेतला जात आहेत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com