.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
J. D. Vance
America Vice President J D Vance News : व्हेनेझुएलाच्या निकोलस मादुरो यांच्या अटकेचे अमेरिकेत पडसाद उमटत आहेत. उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांच्या वॉशिंग्टनमधील निवासस्थानावर दगडफेक करण्यात आली आहे. याप्रकरणी अमेरिकन पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
जे.डी. व्हान्स यांच्या ज्या घरावर हल्ला झाला ते निवासस्थान वॉशिंग्टन डीसीच्या बाहेरील भागात आहे. प्राप्त माहितीनुसार, सिक्रेट सर्विस एजंट्सनी रात्री साधारण सव्वाबारा वाजता घरातून कोणालातरी पळून जाताना पाहिले आणि त्यांना तत्काळ पोलिसांना कळवले. घटनेच्या वेळी जे.डी. व्हान्स त्यांच्या अधिकृत निवासस्थानी नव्हते.
स्थानिक माध्यमांच्या छायाचित्रांमध्ये जे डी व्हान्स यांच्या घराच्या खिडक्यांना नुकसान झाल्याचे दिसून आले आहे, परंतु नुकसान कसे झाले किंवा घटनेचे संपूर्ण कारण काय आहे हे स्पष्ट नाही. सिक्रेट एजंट प्रवक्त्यांनी हल्ल्याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
"आम्ही माहिती गोळा करत आहोत आणि हा हल्ला व्हेनेझुएलाशी संबंधित आहे की गुन्हेगारी हल्ला आहे, हे निश्चित करत आहोत." असं त्यांना सांगितले आहे. मादुरोविरुद्धच्या कारवाईनंतर जेव्हा अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले तेव्हा जेडी व्हान्स यांनी पुढाकार घेतला होता.
तर एका पोस्टमध्ये व्हान्स यांनी म्हटले होते की ''व्हेनेझुएला हा कोकेन पुरवठादार आहे. बंदी असूनही, त्याचे तस्कर तेथे काम करत राहिले. जेडी व्हान्स यांनी म्हटले की कम्युनिस्ट राजवटीने अमेरिकेचे हक्क हिरावून घेतले होते, जे आता परत मिळवण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आपण एक महासत्ता बनू.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.