Vande Bharat Sleeper Train Route नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

India’s First Vande Bharat Sleeper Train Announced :जाणून घ्या, कोणत्या मार्गावर धावणार आहे आणि या ट्रेनचे तिकीट दर कसे असतील?
Vande Bharat Sleeper Train Route   नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!

esakal

Updated on

Vande Bharat Sleeper Train Route Details : केंद्र सरकारने देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचा मार्ग जाहीर केला आहे. गुरुवारी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजधानी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत या मार्गाची घोषणा केली. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

ही देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन असेल, ज्याची काही दिवसांपूर्वी यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. यावेळी मार्गासोबतच वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर देखील जाहीर करण्यात आले आहे. १६ डब्यांची ही वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या आराम आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट दर किलोमीटरनुसार निश्चित केले जाईल. यामध्ये फर्स्ट एसीसाठी भाडे प्रति किलोमीटर ३.८० रुपये आकारले जाईल.  तर सेकंड एसी भाडे प्रतिकिलोमीटर ३.१० रुपये आणि थर्ड एसीसाठी प्रतिकिलोमीटर भाडे २.४० रुपये असेल.

Vande Bharat Sleeper Train Route   नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!
Vande Bharat Sleeper Train Speed Test Video : ताशी १८० किमी वेग तरीही काठोकाठ भरलेल्या ग्लासांमधून एकही थेंब पाणी सांडले नाही...!

भारतीय रेल्वेने नुकतीच स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची अंतिम हाय-स्पीड चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. ही चाचणी कोटा-नागदा सेक्शन दरम्यान घेण्यात आली, यावेळी ट्रेन १८० किमी प्रति तास वेगाने धावली. यावेळी ट्रेनमध्ये काठोकाठ पाण्याने भरलेल्या ग्लासमधून एक थेंबही पाणी पडले नसल्याचेही दिसले. ही चाचणी रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली घेण्यात आली होती.

Vande Bharat Sleeper Train Route   नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!
Virat Kohli breaks Viv Richards' record : विराट कोहलीने २०२५च्या शेवटच्या दिवशी मोडला विव्ह रिचर्ड्स यांचाही विक्रम!

चाचणी दरम्यान, ट्रेनची गुणवत्ता, स्थिरता, ब्रेकिंग सिस्टम, आपत्कालीन ब्रेक, सुरक्षा प्रणाली आणि इतर तांत्रिक बाबींची चाचणी घेण्यात आली. सर्व चाचण्यांमध्ये ट्रेनची कामगिरी पूर्णपणे समाधानकारक असल्याचे आढळून आले आणि सीआरएसने चाचणी यशस्वी झाल्याचे घोषित केले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या हाय-स्पीड ट्रायलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

Vande Bharat Sleeper Train Route   नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील पहिल्या 'वंदे भारत स्लीपर ट्रेन'चा मार्ग झाला जाहीर!
Couple on Railway Track Viral Video : प्रेम आंधळं असतं ऐकलय, पण इतकं? ; रेल्वेखाली बसले होते गुटरगु करत, क्षणात निघाली रेल्वे अन् मग...

याशिवाय, रेल्वेमंत्र्यांनी घोषणा केली की सहा महिन्यांत आठ वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होतील. तर वर्षाच्या अखेरीस बारा नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होतील. अंतिम उद्घाटन ट्रेनची तारीख एक-दोन दिवसांत जाहीर केली जाईल, तर ट्रेन १५-२० दिवसांत सुरू केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com